Good Morning Wishes In Marathi: जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक सुंदर होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी हटके आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला १० सर्वोत्तम संदेश सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता. तुमच्या या एका संदेशने त्यांचा दिवस तर चांगला जाईलच शिवाय त्यांनी योजिलेले महत्वाची कामेही उत्साहात पार पडतील. चला तर मग पाहूया सुंदर संदेश..
विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
शुभ सकाळ!
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…
शुभ सकाळ !
दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ!
शिस्तीशिवाय जीवन म्हणजे
देवावीनं देऊळ
सुंदर दिवसाची पहाट,
सुंदर विचाराने
शुभ सकाळ!
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
शुभ सकाळ !
कोणी कितीही घेरलं तरी
स्वतःचे अस्तित्व
स्वतः निर्माण करता यायला पाहिजे
शुभ सकाळ!
सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.
शुभ सकाळ !
आपला आजचा दिवस आनंदात जावो
यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खूप मोठा,
स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ.
शुभ सकाळ!
माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने,
कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर,
एखादे वेळेस साथ देणार नाही ,
पण माणुसकी प्रेमळ स्वभाव
आणि आत्मविश्वास कधीही
तुम्हाला एकटे पडू देणार नाही…
शुभ सकाळ!
जर यशाच्या गावाला जायचेअसेल तर
अपयशाच्या वाटेनेच
प्रवास करावा लागेल.
शुभ सकाळ !