Good Morning Marathi Messages: सोमवार असो किंवा गुरुवार दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला मेसेज पाठवले तर ते हे काम अगदी निवडकपणे करतात, पण तुम्ही कधी विचार करण्याचा प्रयत्न केला आहे का की, त्या फॉरवर्ड केलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते. अंथरुणातून उठण्यापूर्वीही आपण झोपलेल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि सकाळी ही पहिली गोष्ट असते. अशा परिस्थितीत एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो. चला तर मग पाहूया असेच काही खास संदेश...
आपुलकी असेल तर जीवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर
नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही नारळ
फोडल्या शिवाय आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही.
शुभ सकाळ
मनाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते.
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषा काही वेगळीच असते.
शुभ सकाळ
आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त
हे महत्वपूर्ण नाही की कोण
आपल्या पुढे आहे आणि कोण
आपल्या पाठीमागे आहे,
तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की
कोण आपल्या सोबत आहे
आणि आपण कोणासोबत आहोत.
तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते !!
जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल
तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.
सुप्रभात
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी !
शुभ सकाळ!
रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली.
शुभ प्रभात!
जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
शुभ सकाळ!
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
शुभ सकाळ !
आनंदाने फुलवुया जीवनाचा,
सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया,
मनाचा फळा..
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या