Good Morning Marathi Message: आजकाल प्रत्येक जण जाग आल्याबरोबर अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी आपल्या फोनकडे पाहतो. बहुतांश लोकांच्या दिनचर्येमध्ये सकाळची ही पहिली गोष्ट असते. फोन पाहताना तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एका खास मॅसेजने करू शकता. यामुळे दिवस चांगला जातो आणि तुमचे मनही प्रसन्न राहते. येथे काही बेस्ट गुड मॉर्निंग मॅसेज आहेत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना तुम्ही सकाळी पाठवू शकता.
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.
सुप्रभात
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलच मिळेल.
शुभ सकाळ.
सोन्याचा साठा करुन मिळालेल्या
श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून
मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…
मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध
हा येणारच, आणि आपली
माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच…
शुभ सकाळ
आवडतं मला त्या लोकांना
सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला
जे माझ्या समोर नसून सुध्दा
माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.
नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही नारळ
फोडल्या शिवाय आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही.
शुभ सकाळ
मनाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते.
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषा काही वेगळीच असते.
शुभ सकाळ
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.
शुभ सकाळ!
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
हीच खरी नाती मनांची,
सकाळच्या सुंदर शुभेच्छा.
संबंधित बातम्या