Makar Sankranti Shubhechha In Marathi : नवीन वर्षाचा पहिला वहीला आणि गोड-धोड सण म्हणजे मकर संक्रांत होय. यंदा मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी, मकर संक्रांती सण साजरा केला जात आहे. सूर्याचे मकर राशीत परिवर्तन होणे या स्थितीला मकर संक्रांती म्हणून ओळखले जाते. सूर्य उत्तरेकडे वळतो यामुळे याला उत्तरायण असेही म्हटले जाते.
मकरसंक्रांत हा एक असा सण आहे जेव्हा सगळे घरातील लोक एकत्र येतात आणि मजामस्ती करतात. विशेषतः पतंग उडवणे, बायकांसाठी हळदीकुंकू, तीळगुड वाटणे आणि तीळगुड घ्या गोड-गोड बोला असे म्हणून आपल्या नातलगांची भेट घेणे यासारख्या परंपरा अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत.
मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात. नववर्षाच्या या पहिल्या सणाला फार महत्व असून, आपल्या प्रियजणांना खास शुभेच्छा देऊन परस्पर नात्यातील गोडवा आणखी वाढवा.
वर्षाचा पहिला सण करा भरभरून साजरा,
तिळात गूळ मिसळा आणि जिभेवर येऊ द्या गोडवा,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
मांजा, चक्री, पतंगीची काटाकाटी, हलवा,
तिळगुळ, गुळपोळी, संक्रांतीची लज्जत न्यारी.
पतंग उडवायला चला रे
जीवनात हास्य भरा रे
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
…
आठवण सुर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मणभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
ऋणानुबंध वाढवा
तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
असं म्हणत मनातील हेवेदावे विसरूया
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
साजरे करू मकर संक्रमण
संकटांवर करून मात
हास्याचे हलवे फुटून
तिळगुळांची करू खैरात
संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
…
तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे
शांत, समाधान आणि प्रेमपूर्वक आयुष्य तुम्हाला लाभू दे,
हीच सदीच्छा, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
…
तीळाची गोडी
प्रेमाची माडी
माडीचा जिना
प्रेमाच्या खूणा
मायेचा पान्हा
साऱ्यांच्या मना
म्हणूनच एक तीळ
सात जना ,
मकर सक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
…
रवडी आणि शेंगदाण्यांची आली आहे बहार,
शेतांमध्ये उगलं सोनं,
आला संक्रांत वाणाचा हा दिन,
हॅपी मकर संक्रांत.
…
गूळ आणि तीळाचा गोडवा,
आकाशात उडणारे उंच उंच पतंग,
या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग…
मकर संक्रांतीनिमित्त माझ्या सर्व प्रियजणांना खूप खूप शुभेच्छा.
…
म……. मराठमोळा सण ,
क…… कणखर बाणा
र…… रंगीबिरंगी तिळगुळ ,
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज ,
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.
…
संबंधित बातम्या