Makar Sankranti In Marathi : सनातन धर्मात मकर संक्रांत सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे, स्नान-दान आणि पूजा करणे शुभ मानले जाते. ज्या दिवशी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. या दिवशी आंघोळ करून खिचडी खाण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.
दिनदर्शिकेनुसार, मकर संक्रांत यावर्षी १४ जानेवारी २०२५ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सूर्य सकाळी ०९ वाजून ०३ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे नामस्मरण, स्नान आणि पूजा केल्याने साधकाचे सर्व दुःख संपते आणि पापांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. परंतु या सणाच्या दिवशी काही कामे वर्ज्य तर काही कामे पुण्यफलदायी मानली जातात. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?
मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे.
स्नानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यदेवाची मंत्रासहीत मनोभावे पूजा करावी.
मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही खिचडी, शेंगदाणे, दही, तिळाचे लाडू, उबदार कपडे आणि पैसे गरीब आणि गरजूंना दान करू शकता.
या सणाला धार्मिक कार्यात वेळ घालवावा आणि ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे.
भगवान सूर्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी 'ॐ सूर्याय नम:' या मंत्राचा जप करू शकता.
यादिवशी महिला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात, या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांना वाण म्हणून सोभाग्याच्या वस्तू दिल्याने तुम्हाला सुख-सौभाग्य लाभेल.
मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे दान करणे उत्तम मानले जाते.
या दिवशी कांदा, लसूण, मांस आणि अल्कोहोलसह तामसिक पदार्थ टाळावेत.
या दिवशी पतंग उडवताना आपल्यामुळे इतरांना कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
या सणाला इतरांचा अपमान करणे टाळा आणि कठोर शब्दांचा वापर करू नका.
मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवीगार झाडे तोडणे टाळावे.
मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये.
संबंधित बातम्या