Makar Sankranti : मकर संक्रांत कधी आहे? जाणून घ्या पूजेची तिथी, मुहूर्त, विधी आणि महत्व
मराठी बातम्या  /  धर्म  /  Makar Sankranti : मकर संक्रांत कधी आहे? जाणून घ्या पूजेची तिथी, मुहूर्त, विधी आणि महत्व

Makar Sankranti : मकर संक्रांत कधी आहे? जाणून घ्या पूजेची तिथी, मुहूर्त, विधी आणि महत्व

Jan 01, 2025 03:47 PM IST

Makar Sankranti 2025 Date In Marathi : नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय. हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक हा सण देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. तब्बल पाच वर्षांनंतर यंदा मकर संक्रांतीचा सण १४ जानेवारीला साजरा केला जात आहे.

मकर संक्रांती २०२५
मकर संक्रांती २०२५

Makar Sankranti 2025 In Marathi : पाच वर्षांनंतर यंदा १४ जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. सूर्य जेव्हा राशीपरिवर्तन करतो तेव्हा त्या बदलाला संक्रांती म्हणतात. जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात. वर्ष २०२५ मध्ये मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी साजरी केली जाईल. हा सण दरवर्षी कधी १४ जानेवारीला तर कधी कधी १५ जानेवारीला साजरा केला जातो. मकर संक्रांतीची तारीख बदलण्याचे कारण म्हणजे सूर्याची होणारी हालचाल. 

मकर संक्रांती तिथी आणि मुहूर्त -

मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वसु नक्षत्र आणि विश्वकुंभ योगाचा योगायोग तयार होत आहे. १४ जानेवारीला मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. तेव्हा खरमास संपेल.

ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी सूर्य मकर राशीत २० मिनिटे उशीरा प्रवेश करतो. दर तीन वर्षांनी सूर्य एक तासानंतर आणि दर ७२ वर्षांनी एका दिवसाच्या विलंबाने मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी सूर्यदेव सकाळी ८ वाजून४५ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. 

मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी ९ वाजून ३ मिनिटे ते ५ वाजून ४६ मिनिटापर्यंत असेल, ज्याचा कालावधी ८ तास ४२ मिनिटे असेल. हा स्नान-दानाचा शुभ मुहूर्त आहे. तसेच, मकर संक्रांतीचा महापुण्यकाल सकाळी ९ वाजून ३ मिनिटे ते रात्री १० वाजून ४८ मिनिटापर्यंत असेल, ज्याचा कालावधी १ तास ४५ मिनिटे असेल. या शुभ मुहूर्तावर पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेष म्हणजे या दिवशी १९ वर्षांनंतर दुर्मिळ योगायोगाने पुष्यातील संक्रांतीला आकाश लाल होईल.

मकर संक्रांतीचे महत्व -

हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजकुमार सूर्यदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवशी सूर्य उत्तरायण असतो. उत्तरायण प्रसंगी सूर्याला अर्घ्य देऊन पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्याने प्रतिपदा तिथी अग्नीला दिली आहे ज्याचा स्वामी ब्रह्मा आहे. 

या दिवशी गरीबांना उबदार कपडे, उडीद, खिचडी. तांदूळ, तीळ आणि चांदी दान करणे विशेष फलदायी असते. पितळेच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्याने पापांचा नाश तर होतोच शिवाय शाश्वत पुण्यही प्राप्त होते. तसेच घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते असे सांगितले जाते.

 

Whats_app_banner