मराठी बातम्या  /  धर्म  /  Makar Sankranti Wishes: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊया, नवउत्साहात नववर्षाचा सण साजरा करूया

Makar Sankranti Wishes: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊया, नवउत्साहात नववर्षाचा सण साजरा करूया

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 14, 2024 10:16 AM IST

Makar Sankranti 2024 Messages Wishes Quotes : मकर संक्रांती हा नवीन वर्षातील पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हा सण अगदी मोठ्या उत्सहात साजरा करतात. यंदा या खास शुभेच्छांनी मकर संक्रांती साजरी करूया.

Makar Sankranti 2024 Wishes
Makar Sankranti 2024 Wishes

वर्ष २०२४ मध्ये १५ जानेवारी रोजी मकर संक्रांती जासरी होईल. सूर्याचे मकर राशीत परिवर्तन होणे या स्थितीला मकर संक्रांती म्हणून ओळखले जाते. सूर्य उत्तरेकडे वळतो यामुळे याला उत्तरायण असेही म्हटले जाते.

मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात. नववर्षाच्या या पहिल्या सणाला फार महत्व असून, सणाच्या शुभेच्छा देऊ आणि उत्साहात सण साजरा करू.

Paush Month Significance: पौष मासारंभ २०२४, जाणून घ्या महत्व आणि सण-उत्सवाची यादी

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा

आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…

मकरसंक्रातीच्या हादिक शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

साजरे करू मकर संक्रमण

संकटांवर करून मात

हास्याचे हलवे फुटून

तिळगुळांची करू खैरात

संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

आठवण सुर्याची,

साठवण स्नेहाची,

कणभर तीळ,

मणभर प्रेम,

गुळाचा गोडवा,

ऋणानुबंध वाढवा

तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

तीळाची गोडी

प्रेमाची माडी

माडीचा जिना

प्रेमाच्या खूणा

मायेचा पान्हा

साऱ्यांच्या मना

म्हणूनच एक तीळ

सात जना ,

मकर सक्रांतीच्या

हार्दिक शुभेच्छा

जपू तिळाप्रमाणे स्नेह

वाढवू गुळाप्रमाणे गोडवा,

तंदरूस्त ठेवा आपले देह

अडचणी हसत हसत सोडवा

तिळगुड घ्या व गोड गोड बोला

मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

तिळात मिसळला गुळ,

त्याचा केला लाडु…

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

म……. मराठमोळा सण ,

क…… कणखर बाणा

र…… रंगीबिरंगी तिळगुळ ,

सं…… संगीतमय वातावरण

क्रा…… क्रांतीची मशाल…

त …… तळपणारे तेज ,

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मांजा, चक्री, पतंगीची काटाकाटी, हलवा,

तिळगुळ, गुळपोळी, संक्रांतीची लज्जत न्यारी.

पतंग उडवायला चला रे

जीवनात हास्य भरा रे

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,

स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,

तिळावर फुलेल पाकाचा काटा,

प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

तिळाची ऊब लाभो तुम्हाला,

गुळाचा गोडवा यावा जीवनाला,

यशाची पतंग उडो गगना वरती,

तुम्हास आणि तुमच्या परिवारास शुभ संक्रांती..

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

मकर संक्रांतीचा आला सण

भरून घ्या गोडव्याने मन

हळदी-कुंकवाचा कार्यक्रम रंगला

पतंग गगनी भिडल्या

मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा

नववर्षाचा पहिला वहीला सण

चौफेर पसरवा आनंदाचे धन

तिळगुड वाटून वाढवा गोडवा

नात्यात जवळीक असूद्या

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

WhatsApp channel