मकर संक्रांती हा नववर्षाचा पहिला मुख्य उत्सव आहे. या वर्षी मकर संक्रांती दोन खास योगात साजरा होईल. सोमवार १५ जानेवारी रोजी रवि आणि वरीयान योग तयार होत आहे. वरीयान योग ७७ वर्षानंतर येत आहे. या दुर्लभ योगात मकर संक्रांतीचे महत्व आणखी वाढून गेले आहे.
वरीयान आणि रवि योग सुख-समृद्धीदायक व यशदायक आहेत. याशिवाय यादिवशी बव आणि बालव करण यांचा देखील प्रभाव राहील.
मकर संक्रांती विविध भागात आपआपल्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करतात. यादिवशी पतंगोत्सवही रंगलेला असतो. तिळगूड देऊन एकमेकांचे तोंड गोड केले जाते. घरी गोडधोड पदार्थ बनवले जातात. महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो. असा हा हिवाळी उत्सव सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन येत असतो.
१४ जानेवारी ला सूर्य रात्री २ वाजून ४४ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. १५ जानेवारीला वरीयान योग सूर्योदयापासून ते रात्री ११ वाजून ११ मिनिटापर्यंत राहील. रवि योग सकाळी ७ वाजून १५ मिनिटे ते सकाळी ८ वाजून ७ मिनिटापर्यंत राहील. या योगात मनोभावे पूजा केल्याने आणि दान-धर्म केल्याने उत्तम आरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. बव करण दुपारी ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत आहे यानंतर बालव करणचा प्रभाव राहील. या दोन्हींना शुभ मानले गेले आहे.
धनुर्मासानंतर लग्नकार्य होत नाही. लग्नकार्यासाठी शुभ मुहूर्त महत्वाचा असतो. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर मांगलिक कार्यांना पुन्हा सुरवात होईल.
जानेवारी - १७, २२, २७,२८,३०,३१
फेब्रुवारी - १, २, ४,६,१२,१३,१७,१८,२४,२६,२७,२८,२९
मार्च - ३,४,६,१६,१७,२६,२७,३०
शक्य असेल तर गंगा स्नान करा किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करा.
तांब्यात गंगाजल घ्या त्यात लाल फूल, लाल चंदन, तीळ टाकून 'ॐ घृणि सूर्याय नम:' या मंत्राचा जप करत सूर्याला जल अर्पण करा.
तिळगुड, बाजरीची खिचडी खा.
काळे तीळ आणि गुडाने तयार केलेले पदार्थ, थंडीचे कपडे, रजई, खिचडी दान करा. यामुळे सूर्य आणि शनि दोघांचा कृपाशीर्वाद राहतो.