मराठी बातम्या  /  धर्म  /  Makar Sankranti 2024: मकर संक्रांती कधी आहे? जाणून घ्या तारीख, महत्व व मान्यता

Makar Sankranti 2024: मकर संक्रांती कधी आहे? जाणून घ्या तारीख, महत्व व मान्यता

Jan 05, 2024 07:00 AM IST

Makar Sankranti 2024 Date: तिळगुड घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत साजरा होणारा नववर्षाचा पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती. या वर्षी मकर संक्रांत कोणत्या तारखेला आहे जाणून घ्या तिथी, महत्व आणि मान्यता.

Makar Sankranti 2024
Makar Sankranti 2024

प्रत्येक महिन्यात सूर्याचे राशीपरिवर्तन होते यास संक्रांती म्हणतात. १२ महिने म्हणजे एका वर्षभरात १२ संक्रांती येतात.परंतू मकर संक्रांतीला खास महत्व आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे या सणाला मकर संक्रांती म्हटले जाते. जाणून घ्या नववर्षातला पहिला सण कोणत्या तारखेला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नववर्ष २०२४ मध्ये मकर संक्रांती १५ जानेवारी सोमवार रोजी साजरी केली जाईल. उत्तरायण, पोंगल, मकरविलक्कू, माघ आणि बिहू अशा विविध नावाने मकर संक्रांत ओळखली जाते. शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने माणसाला कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते.

Margashirsha Guruvar 2024: मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी व कसे करावे? संभ्रम दूर करा

संक्रांतीच्या तारखातला फरक

सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या क्रियेला संक्रांत म्हणतात. सूर्य वर्ष ३६५.२४२२ दिवसाचे तर चंद्र वर्ष ३५४.३७२ दिवसांचे असते. चंद्र कालगणना ही सुर्यकालगणनेपेक्षा ११.२५ दिवसाने मागे आहे. त्यामुळेच आपण ३ वर्षांत एक अधिक मास घेऊन ३६५ दिवस पूर्ण करीत असतो. लीप इअरच्या ह्या फरकाने मकर संक्रांतीच्या तारखात फरक पडत असतो.

मकर संक्रांती तिथी व मुहूर्त

या वर्षी मकर संक्रांती १५ जानेवारी रोजी साजरी केली जाईल. गेल्या दोन वर्षापासून १५ जानेवारी रोजीच मकर संक्रांती सण साजरा केला जात आहे. मिथिला पंचांगानुसार सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी तर काशी पंचांगानुसार सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. यामुळे १५ जानेवारीच्या दिवशीच हा उत्सव साजरा केला जाईल.

Leap Year: वर्ष २०२४ लिप ईअर, जाणून घ्या लिप वर्ष म्हणजे काय ?

मकर संक्रांती शुभ योग

मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री ११.११ पर्यंत वरियान योग राहील. याशिवाय या दिवशी रवि योगही तयार होत आहे. सकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी रवि योग आहे. याशिवाय बव आणि बालव करण देखील निर्माण होत आहे. बव करण दुपारी ३.३५ पर्यंत आहे.या योगांमध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते, असे सांगितले जाते.

WhatsApp channel
विभाग