मराठी बातम्या  /  धर्म  /  Makar Sankranti 2024 Daan: मकर संक्रांतीला राशीनुसार करा दान, व्हाल मालामाल

Makar Sankranti 2024 Daan: मकर संक्रांतीला राशीनुसार करा दान, व्हाल मालामाल

Jan 15, 2024 02:58 PM IST

Makar Sankranti Daan About Rashi : आज १५ जानेवारी २०२४ सोमवार रोजी, मकर संक्रांत असून, दान-धर्म करायलाही महत्व आहे. राशीनुसार कोणी काय दान करावे जाणून घ्या.

Makar Sankranti Daan About Rashi
Makar Sankranti Daan About Rashi

मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश असायला हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदुळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.

शास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी आपले भाग्य उजळविण्यासाठी राशीनूसार काही उपाय करावेत. या उत्तरायणात राशीनूसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्ही मालामाल व्हाल.

मेष -

ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या इच्छापूर्तीसाठी लोकांनी तीळ आणि मच्छरदानीचे दान करावे.

ट्रेंडिंग न्यूज

वृषभ -

शास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे व तिळाचे दान करावे.

Makar Sankranti : कशी करतात मकर संक्रांतीची पूजा? तीळगुळाचे महत्त्व काय? वाचा!

मिथुन -

या राशीचा स्वामी बुध आहे. हिरवे कापड, तीळ, मच्छरदानीचे दान करावे.

कर्क -

या राशीचा स्वामी चंद्र आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी साबूदाणा आणि लोकरीचे वस्त्र दान करावे.

सिंह -

या राशीच स्वामी सूर्य आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी माणिक, गहू, लाल कापड, लाल फूल , गुळ , सोने, तांबे, चंदन दान करावे.

कन्या -

या राशीचा स्वामी बुध आहे, राशीच्या स्वामी ग्रहानुसार तेल, उडीद, तिळाचे दान करावे.

तूळ -

या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी तेल, रुई, वस्त्र, तांदूळ दान करावेत.

वृश्चिक -

या राशीचा स्वामी मंगळ आहे. गरिबांना तांदूळ , खिचडी, धान्य दान करावे.

Makar Sankranti Wishes: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊया, नवउत्साहात नववर्षाचा सण साजरा करूया

धनु -

या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी तीळ व हरभऱ्या ची डाळ दान केल्यास विशेष लाभ प्राप्त होईल.

मकर -

या राशीचा स्वामी शनि आहे. या राशीच्या लोकांनी तिळ, तेल, काळी गाय, काळे वस्त्र यांचे दान करावे.

कुंभ -

ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनी आहे. त्यामुळे या राशीच्या तीळ, साबण, वस्त्र, कंगवा आणि अन्नदान करावे.

मीन -

शास्त्रानुसार या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी मध, केशर, हळद, पिवळे वस्त्र यांचे दान करावे.

WhatsApp channel