Mahatma Phule Jayanti 2024 special: महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार अगदी आजच्या तरुण पिढीसाठीही खूप मार्गदर्शक आहेत. आपल्या देशात समाजात असे अनेक महापुरुष होऊन गेले, ज्यांनी समाजाची उन्नती केली. या महापुरुषांनी मर्यादा ओलांडून समाजात प्रचलित असलेल्या प्रत्येक वाईट गोष्टींना कडाडून विरोध केला. समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे देखील अशा महापुरुषांपैकी एक आहेत. महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील एक महान समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कटगुण गावात झाला. त्यांचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी होती.
गोविंदराव फुले आणि चिमणाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर समाजात चालत असलेल्या भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिला आणि दलितांच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी शाळा तर सुरू केलीच, पण त्याबरोबरच १८४८ साली पुण्यात ‘बाल विधवा विवाह प्रतिबंधक संस्था’ स्थापन केली. या संस्थेने बाल विधवांच्या पुनर्विवाहाचा जोरदार प्रचार केला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजसुधारक म्हणून मोलाची भूमिका बजावली आणि त्यांनी नेहमीच समाजाला योग्य मार्गदर्शन केले. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. या निमित्ताने वाचूया त्यांचे काही अनमोल विचार...
> जातीय भेदभाव ही एक अमानवी प्रथा आहे.
> जातीवाद दूर करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.
> समाजाच्या प्रगतीसाठी महिलांना शिक्षित करणे आवश्यक आहे.
> सद्भावना आणि सहानुभूती हा मानवी जीवनाचा आधार आहे.
> सर्व मानव समान आहेत, कोणाशीही जातीच्या आधारावर भेदभाव करू नये.
> शिक्षण ही स्त्री आणि पुरुषांची प्राथमिक गरज आहे.
> सामाजिक न्याय आणि समतेसाठी संघर्ष केला पाहिजे.
> आर्थिक विषमतेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान ढासळले आहे.
> शिक्षणामुळेच व्यक्ती आणि समाजाची उन्नती होऊ शकते.
> विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
> तुमच्या संघर्षात सामील झालेल्यांची जात विचारू नका.