Mahamrityunjay Mantra Katha : भगवान शंकाराला देवांचा देव महादेव म्हणतात. महादेव नेहमी आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकतात. करुणा आणि संरक्षणाचे प्रतीक असलेल्या भगवान शंकराने आपल्या एका भक्ताचा मृत्यू टाळला होता.या प्रसंगाशी संबंधित एक कथा आहे.
या कथेनंतरच रोग, अकाली मृत्यू, भय असे अनेक विकार दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राची रचना झाली.
महामृत्युंजय मंत्र इतका शक्तिशाली मानला जातो, की त्याचा नियमित जप केल्याने अकाली मृत्यूची भीती तर दूर होतेच शिवाय विविध जीवघेण्या रोगांपासूनही मुक्ती मिळते. चला तर मग महामृत्युंजय मंत्राची उत्पत्ती का आणि कशी झाली? तसेच, या मंत्राला मृत्यू टाळणारा मंत्र का म्हणतात ते जाणून घेऊया.
एका पौराणिक कथेनुसार, मृकंडू नावाचे ऋषी भगवान शंकराचे खूप मोठे भक्त होते. ऋषी मृकांडू यांना मूलबाळ नव्हते. अपत्यप्राप्तीसाठी त्यांनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवाने आपला भक्त मृकंडू यांना अपत्यप्राप्तीचे वरदान दिले. काही काळानंतर मृकंडू आणि त्यांच्या पत्नीला मार्कंडेय नावाचा मुलगा झाला, परंतु काही दिवसांनी ऋषी मुनींनी मृकांडू यांना सांगितले, की त्यांचा मुलगा अल्पायुषी आहे.
त्यांच्या मुलाचे आयुष्य फक्त १६ वर्षांचे आहे. हे ऐकून मृकांडू यांना खूप वाईट वाटले, पण त्यांना भगवान शिवावर पूर्ण विश्वास होता की भगवान शिव आपल्या मुलाचा मृत्यू टाळतील.
मृकांडूच्या पत्नीने सांगितले की, त्यांनी महादेवाला शरण जावे. काही दिवसांनी म्हणजेच मार्कंडेय थोडा मोठा झाल्यानंतर पालकांनी मार्कंडेयला त्याच्या अल्प आयुष्याबद्दल सांगितले. हे ऐकून मार्कंडेय एका शिवमंदिरात तपश्चर्या करायला गेला.
मंदिरात बसून मार्कंडेयाने महामृत्युंजय मंत्र रचला आणि त्याचा जप सुरू केला. त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्राचा अखंड जप करत मार्कंडेयाने वयाची १६ वर्षे पूर्ण केली. यानंतर जेव्हा यमराज त्याचे आयुष्य पूर्ण झाल्यावर मार्कंडेयाला घेण्यासाठी आले, तेव्हा मार्कंडेय भगवान शंकराची पूजा करत होता. जेव्हा यमराजाने मार्कंडेयाचा जीव काढून घेण्यासाठी त्याचा फास फेकला तेव्हा मार्कंडेयाने त्वरीत शिवलिंगाला मिठी मारली आणि रक्षणासाठी भगवान शिवाची प्रार्थना करू लागला.
हे पाहून यमराजाने पुन्हा एकदा पूर्ण आक्रमकतेने फास फेकला, जो शिवलिंगावर आदळला. हे पाहून भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी यमराजांना आपल्या भक्तांशी नम्रपणे वागण्यास सांगितले. भगवान शिवाने यमराजाला आपला भक्त मार्कंडेयचे प्राण दान देण्यास सांगितले, परंतु यमराजाने भगवान शिवाला निसर्ग नियमांची आठवण करून दिली.
हे ऐकून मग महादेवाने भक्त मार्कंडेयाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला. अशाप्रकारे मार्कंडेयाने रचलेला महामृत्युंजय मंत्र अकाली मृत्यू टाळणारा ठरला.
महामृत्युंजय मंत्राचा जप करताना लक्षात ठेवा की तुम्ही कोणताही शब्द चुकीचा उच्चारू नये, म्हणून आरामात या मंत्राचा जप करा.
महामृत्युंजय मंत्राचा जप मनातच करावा. ओरडून या मंत्राचा जप करू नका.
महामृत्युंजय मंत्राचा जप पूर्वेकडे तोंड करूनच करावा.
महामृत्युंजय मंत्राचा जप करताना इकडे-तिकडे विचलित होऊ नका. मंत्रांच्या जपावर पूर्ण लक्ष केंद्रित करा.
आरामात बसून महामृत्युंजय मंत्राचा जप करा. धावताना, खाताना किंवा झोपताना महामृत्युंजय मंत्राचा जप करू नये. त्याच वेळी, जर एखाद्या आजारी व्यक्तीने महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर तो झोपून, डोळे बंद करून आणि ध्यान करून या मंत्राचा जप करू शकतो.
ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्।
उर्वरुकमिव बंधनानां मृत्युोर्मक्षिय ममृतात् ॥
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या