हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्व आहे. महाशिवरात्री हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. फाल्गुन महिना सुरू होताच शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. हा दिवस शिव आणि शक्तीच्या मिलनाचा दिवस मानला जातो, कारण धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता.
अशातच, आता महाशिवरात्रीच्या पवित्र सणाला अवघे काही दिवस उरले आहेत. भगवान शंकराच्या पूजेसाठी ही तिथी विशेष मानली जाते. तसेच, अशी मान्यता आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती कैलासातून पृथ्वीच्या दर्शनासाठी येतात. यामुळेच महाशिवरात्रीला ब्रह्म मुहूर्तापासून रात्रीपर्यंत विेशेष पूजा केली जाते.
सोबतच, हिंदू धर्मात आरतीलाही खूप महत्व आहे. आरती केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ प्राप्तीचे आशिर्वाद देतात, असे मानले जाते.
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।१।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।
कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।
आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।२।।
देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।
त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।
तें त्वां असुरपषं प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें।। जय. ।।३।।
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।४।।
जय पार्वती माता जय पार्वती माता।
ब्रह्म सनातन देवी शुभ फल की दाता॥
जय पार्वती माता
अरिकुल पद्म विनाशिनि जय सेवक त्राता।
जग जीवन जगदंबा, हरिहर गुण गाता॥
जय पार्वती माता
सिंह को वाहन साजे, कुण्डल हैं साथा।
देव वधू जस गावत, नृत्य करत ताथा॥
जय पार्वती माता
सतयुग रूपशील अतिसुन्दर, नाम सती कहलाता।
हेमांचल घर जन्मी, सखियन संग राता॥
जय पार्वती माता
शुम्भ-निशुम्भ विदारे, हेमांचल स्थाता।
सहस्त्र भुजा तनु धरि के, चक्र लियो हाथा॥
जय पार्वती माता
सृष्टि रूप तुही है जननी शिवसंग रंगराता।
नन्दी भृंगी बीन लही सारा जग मदमाता॥
जय पार्वती माता
देवन अरज करत हम चित को लाता।
गावत दे दे ताली, मन में रंगराता॥
जय पार्वती माता
श्री प्रताप आरती मैया की, जो कोई गाता।
सदासुखी नित रहता सुख सम्पत्ति पाता॥
जय पार्वती माता
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांग सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ता फळाची।।
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।।
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ।। २ ।।
लंबोदर पितांबर फणिवर वंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ।। ३ ।।
कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ॥
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥