Mahashivratri 2025: हिंदू धर्मात महाशिवरात्री सणाला अधिक महत्त्व आहे. महाशिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते. या महिन्यातील महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी या दिवशी साजरी केली जात आहे. यावर्षी महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. हिंदू धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्रीला भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्यास इच्छित फळ मिळते. इतकेच नाही तर या दिवशी शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे मानले जाते. असे म्हटले जाते की, यामुळे जीवनात सुख-समृद्धी येते. जाणून घ्या, महाशिवरात्रीला शिवलिंगावर काय अर्पण करावे.
ज्योतिषशास्त्रानुसार शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळते. यासोबतच शनिदोष आणि शनिच्या साडेसातीचे अनिष्ट परिणाम कमी होतील, असे मानले जाते.
असे मानले जाते की भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने आशीर्वाद मिळतो आणि दारिद्र्य दूर होते. त्याचबरोबर शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते.
शिवपुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी विषाचा प्यालाही बाहेर पडला. मात्र हे विष किंवा हलाहल तेव्हा कोणीही प्राशन करू शकले नाही. तेव्हा सर्व देवी-देवता विषाचा प्याला घेऊन भगवान शंकराकडे आले. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकराने ते विष पिऊन टाकले होते. हे विष प्राशन केल्यानंतर भगवान शिव बेशुद्ध झाले. विषाचा प्रभाव कमी व्हावा म्हणून सर्वांनी शिवाच्या मस्तकावर भांग आणि धोतरा ठेवला. तेव्हापासून भगवान शंकराला भांग आणि धोतरा अर्पण करण्याची प्रथा पडली आणि तिला धार्मिक मान्यता आहे.
महाशिवरात्रीला भगवान शंकराला चंदन अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात, असे मानले जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला दूध आणि पाण्याने अभिषेक करावा. असे केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवतात. इतकेच नाही, तर भगवान शंकर आपले संकटांपासून संरक्षण करतात, असे मानले जाते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या