Mahashivratri 2025 In Marathi : हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक चंद्र महिन्यातील १४ वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्या महाशिवरात्रीला आध्यात्मिक महत्व आहे.
हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. तसेच त्यांच्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत पाळले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरासोबत माता पार्वतीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यासोबतच सुख आणि सौभाग्यही वाढते. पौराणिक कथेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाहही याच दिवशी झाला होता. जाणून घेऊया महाशिवरात्री कधी आहे, शुभ मुहूर्त, मंत्र, महत्व आणि पूजा पद्धत.
चतुर्दशी तिथी प्रारंभ - २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी
चतुर्दशी तिथी समाप्ती - २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत.
उदया तिथीनुसार बुधवार २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत साजरे करण्यात येईल.
सकाळी ६ वाजुन ४८ मिनिट ते ८ वाजुन ५४ मिनिट
या दिवशी श्रवण नक्षत्राचा शुभ योग तयार होत आहे. हे नक्षत्र संध्याकाळी ५:०८ पर्यंत राहील. यासोबतच परिध योगही राहील. महाशिवरात्रीच्या दिवशी श्रवण नक्षत्र आणि परिध योगाचा विशेष संयोग होत आहे. पंचांगानुसार हा योग २६ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजुन ८ मिनिटांपर्यंत राहील.
आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. शिव परिवारासह सर्व देवी-देवतांची विधिवत पूजा करावी. उपवास ठेवायचा असेल तर हातात पवित्र पाणी, फुले आणि अक्षत घेऊन व्रत पाळण्याची शपथ घ्या. त्यानंतर संध्याकाळी घरातील मंदिरात दिवा लावावा. त्यानंतर शिवमंदिरात किंवा घरी महादेवचा अभिषेक करून शिव परिवाराची विधीवत पूजा करावी. आता महाशिवरात्री व्रताची कथा ऐका. त्यानंतर तुपाचा दिवा लावून पूर्ण भक्तिभावाने शंकराची आरती करावी. शेवटी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शेवटी क्षमेची प्रार्थनाही करा.
ॐ नमः शिवाय
ॐ त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्वरुकमिव बंधनानमृत्योरमुखिया मामृतत् ||
महाशिवरात्रीच्या दिवशी या मंत्राचा जप व महादेवाचे नामस्मरण करावे.
संबंधित बातम्या