मराठी बातम्या  /  धर्म  /  Mahashivratri Wishes : महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा द्यायच्या आहे? वाचा आणि पाठवा हे खास संदेश

Mahashivratri Wishes : महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा द्यायच्या आहे? वाचा आणि पाठवा हे खास संदेश

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 06, 2024 08:05 PM IST

Mahashivratrichya shubhechha : भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. शुक्रवार ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. शिवभक्त महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करतात. हा उत्साह शुभेच्छा देऊन आणखी वाढवूया.

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

प्रत्येक चंद्र महिन्यातील १४ वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्‍या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्‍या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे.

महाशिवरात्रीच्या सणाचे महत्त्व आहे कारण ही शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे. या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक चालतो आणि भक्तही या दिवशी उपवास करतात.समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा देऊन या खास दिवसाला आणखी खास करूया.

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

ॐ नमः शिवाय…

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

हर हर महादेव

...

शिव अनादि शिव अनंत

शिवमहिमेने प्रकाशला आसमंत

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

...

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..

तुज विण शंभु मज कोण तारी…

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

...

शिव शंकराची शक्ती,

शिव शंकराची भक्ती,

आपल्या जीवनात येवो भरपूर आनंद आणि सुख-समृद्धी,

ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी हीच शंकराचरणी प्रार्थना…

महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

...

शिव सत्य आहे,

शिव सुंदर आहे,

शिव अनंत आहे,

शिव ब्रम्ह आहे,

शिव शक्ती आहे,

शिव भक्ती आहे,

महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

...

ॐ मध्ये आहे आस्था..

ॐ मध्ये आहे विश्वास..

ॐ मध्ये आहे शक्ती..

ॐ मध्ये आहे सर्व संसार..2

ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..

महाशिवरात्रीच्या भरपूर शुभेच्छा

...

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

वीषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।

तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा

महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !

...

जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणि

जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.

महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा..!

...

शिवपूजनात मनोभावे करा दैवताला वंदन

घरात येईल सुख-समृद्धी व ऐश्वर्य

महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

...

ॐ त्र्यंबक यजामहे सुगंधि पुष्टि वर्धनम

ऊर्वा रूकमिव बंधान मृत्योरर्मक्षिय मामृतात

महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा..!

...

महादेवामुळेच संसार आणि

महादेवामुळेच शक्ती आहे

स्वर्ग सुख आणि आनंद

महादेवाच्या भक्तीत आहे.

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

WhatsApp channel

विभाग