Mahashivratri 2024 Wishes : महाशिवरात्री हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. फाल्गुन महिना सुरू होताच शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. हा दिवस शिव आणि शक्तीच्या मिलनाचा दिवस मानला जातो, कारण धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता.
यंदा महाशिवरात्रीचा सण ८ मार्च रोजी येत आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर भक्त भगवान भोलेनाथाचा जलाभिषेक करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करतात.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करणे सोपे असते, असे म्हणतात. तसेच, या खास दिवसाच्या निमित्ताने लोक आपल्या प्रियजनांना शिवरात्रीच्या शुभेच्छा देतात आणि त्यांच्या आनंदी भविष्यासाठी प्रार्थना करतात.
अशा परिस्थितीत तुम्हीदेखील तुमच्या प्रियजनांना महाशिवरात्रीच्या अनोख्या शुभेच्छा पाठवू शकता.
जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे.
जय महाकाल हर हर महादेव….
कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव …
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
"शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!"
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो …
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी ,
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
सोमवार हा महादेवाचा वार,
शिव शंभो सर्वांचे तारणहार
करितो व्रत महाशिवरात्रीला
नमन माझे, चित्त माझे, मन माझे
देऊळातील शंकराच्या चरणी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
शिवाची राहो तुमच्यावर कृपा
तुमच्या नशिबाचा होवा कायापालट
तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
काल पण तूच
महाकाल पण तूच
लोक ही तूच
त्रिलोकही तूच
शिव पण तूच
आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव
बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड,
शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले…
हॅपी महाशिवरात्री
"शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!"
"बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला."
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!"
शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
महादेवच स्वर्ग आहेत
महादेवच मोक्ष आहेत
महादेव प्राप्ती हेच
जीवनाचे लक्ष आहे
हर हर महादेव…
जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणि
जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
चिंता नाही काल ची
बस कृपा कायम राहो
महाकाल ची…!
हर हर महादेव…
सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ,
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…
हर हर महादेव!
शुभ महाशिवरात्री…