भगवान शंकराला बेलपत्र का अर्पण केले जाते? बेलपत्रामुळे महादेव लवकर का प्रसन्न होतात? कारण जाणून घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  भगवान शंकराला बेलपत्र का अर्पण केले जाते? बेलपत्रामुळे महादेव लवकर का प्रसन्न होतात? कारण जाणून घ्या

भगवान शंकराला बेलपत्र का अर्पण केले जाते? बेलपत्रामुळे महादेव लवकर का प्रसन्न होतात? कारण जाणून घ्या

Feb 27, 2024 04:56 PM IST

mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला महादेवाचे भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. या दिवशी सर्वत्र शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होते. शिवालयात हर हर महादेवचा नाद घुमतो. हा सण उत्साहात साजरा केला जातो.

mahashivratri 2024
mahashivratri 2024

Mahashivratri 2024 : पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला.

महाशिवरात्रीला महादेवाचे भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. या दिवशी सर्वत्र शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होते. शिवालयात हर हर महादेवचा नाद घुमतो. हा सण उत्साहात साजरा केला जातो. सर्वजण शिवभक्तीत तल्लीन होतात. यासोबतच लोक या दिवशी पूजेदरम्यान भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र अर्पण करतात. 

बेलपत्राशिवाय शिवपूजा अपूर्ण असल्याचे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया बेलपत्र अर्पण केल्यावर महादेव लगेच का प्रसन्न होतात? विशेष म्हणजे, यामागे एक पौराणिक कथा आहे.

महादेवाला बेलपत्र का अर्पण केले जाते?

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर पडल्यामुळे, संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाले. देव आणि दानवांनाही याचा प्रचंड त्रास झाला. मग सर्वांनी भगवान शंकराची पूजा केली आणि हलाहल विषापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली. मग भगवान शंकराने ते हलाहल विष प्यायले आणि त्यातून सर्वांना मुक्त केले. 

विषाची उष्णता इतकी होती, की त्याचा प्रभाव कमी झाला नाही आणि महादेवाचा कंठ निळा पडला.

त्यानंतर सर्व देवतांनी महादेवाला बेलपत्र आणि जल अर्पण केले. बेलपत्राच्या प्रभावामुळे विषाचे तापमान कमी होऊ लागले. तापमान कमी करण्यासाठी बेलपत्र खरोखर उपयुक्त आहे. देवतांनी बेलपत्र अर्पण केल्यावर भगवान शंकराचा ताप कमी झाला आणि त्यांनी आनंदी होऊन सर्वांना आशीर्वाद दिला की आतापासून जो कोणी मला बेलपत्र अर्पण करेल, त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करीन. तेव्हापासून भगवान शंकरावर किंवा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा चालू आहे.

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner