महाशिवरात्री हा सण हिंदू अनुयायी मोठ्या उत्साहात साजरा करतात. पंचांगानुसार, दरवर्षी माघ वद्य चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला.
यंदा महाशिवरात्री ८ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकराची अनेक रूपात पूजा केली जाते.
महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची आणि उपवास पाळण्याची परंपरा आहे. मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर विधीपूर्वक अभिषेक केल्याने साधकाला शुभ फळ मिळते आणि महादेव प्रसन्न होतात.
महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून महादेवाचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी.
स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
यानंतर दही, दूध, मध, तूप आणि गंगाजल एकत्र करून मंदिरात किंवा घरात शिवलिंगाला स्नान घालावे.
यानंतर अक्षत, मोळी, चंदन, बिल्वाची पाने, सुपारी, फळं, फुलं, नारळ यांसह विशेष वस्तू अर्पण करा.
आता तुपाचा दिवा लावून महादेवाची आरती करावी आणि विशेष मंत्रांचा जप करावा.
शेवटी भगवान शंकराला फळं, मिठाई इत्यादी अर्पण करा.
यानंतर लोकांमध्ये प्रसादाचे वाटप करा.
दही, दूध, मध, तूप, पाणी, गंगाजल, अक्षत, मोळी, चंदन, बिल्वची पाने, सुपारी, सुपारी, फुले, फळे, मिठाई इ.
महाशिवरात्रीची पूजा सूर्योदयापासून दिवसभरात केव्हाही करता येते. मात्र, प्रदोष आणि निशित काळतील पूजेला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, ९ मार्चला मध्यरात्री १२ वाजून ०७ मिनिट ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत निशिता पूजेचा शुभ मुहूर्त असेल.
निशिता काळ मुहूर्त - १२.०७ AM ते १२.५५ AM (९ मार्च २०२४)
व्रत पारण मुहूर्त - सकाळी ०६.३७ ते दुपारी ०३.२८ (९ मार्च २०२४)
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या