Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला या गोष्टी दान करा, महादेवाच्या कृपेने धनलाभ होईल
मराठी बातम्या  /  धर्म  /  Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला या गोष्टी दान करा, महादेवाच्या कृपेने धनलाभ होईल

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला या गोष्टी दान करा, महादेवाच्या कृपेने धनलाभ होईल

Mar 04, 2024 03:49 PM IST

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला भगवान शंकराची अनेक रूपात पूजा केली जाते. या दिवसी महादेवाची पूजा केल्याने भोलेनाथ भक्तांच्या जीवनात काहीही कमी पडू देत नाहीत. यासोबतच माता पार्वतीच्या कृपेने सुख-समृद्धीचा आशीर्वादही प्राप्त होतो.

mahashivratri 2024
mahashivratri 2024

यंदा महाशिवरात्री ८ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. म्हणजेच महाशिवरात्री हा सण आता जवळ आला असून, लोकांनी महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू केली आहे. महादेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा सण श्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते. 

पंचांगानुसार, दरवर्षी माघ वद्य चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला.

महाशिवरात्रीला भगवान शंकराची अनेक रूपात पूजा केली जाते. या दिवसी महादेवाची पूजा केल्याने भोलेनाथ भक्तांच्या जीवनात काहीही कमी पडू देत नाहीत. यासोबतच माता पार्वतीच्या कृपेने सुख-समृद्धीचा आशीर्वादही प्राप्त होतो.

या सोबतच महाशिवरात्रीला काही गोष्टींचे दान करणेही शुभ मानले जाते. महाशिवरात्रीला दान केल्यास महादेव भक्तांना इच्छित फळ देतात. तसेच, भोलेनाथांची तुमच्यावर सदैव कृपा राहील. महाशिवरात्रीला पूजा पद्धतीनुसार कोणत्या वस्तूंचे दान करावे आणि त्याचे काय फायदे होतात? ते येथे जाणून घेऊया.

महाशिवरात्रीला या गोष्टींचे दान करा, दुप्पट फळ मिळेल

जल दान - या दिवशी जल अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते.शास्त्रात जल अर्पण करणे आणि त्याचे दान करणे याला खूप महत्त्व आहे.

दुध दान- महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचे दूध शिवलिंगाला अर्पण केल्याने अनेक फल प्राप्त होतात. पूजा पद्धतीनुसार या दिवशी दूध दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते. याशिवाय कुंडलीतील चंद्रही बलवान होतो.

तूप दान - गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देसी तूप दान केल्याने गरिबी दूर होते आणि ज्ञान आणि बुद्धीची प्राप्ती होण्यास मदत होते.

काळ्या तिळाचे दान - महाशिवरात्रीला तिळाचे दान केल्याने भोलेनाथाची कृपा होते. तसेच पितृदोषाने त्रस्त असलेल्यांना भोलेनाथांच्या कृपेने या दोषापासून मुक्ती मिळते. 

ज्योतिष शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ दान केल्याने शनिदोषही नाहीसा होतो, कारण शनिदेवाचे गुरु भगवान शिव आहेत.

कपड्यांचे दान- महाशिवरात्रीला गरिबांना आणि गरजूंना कपडे दान करा. यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांना धनवान होण्याचा आशीर्वाद देतात. असे मानले जाते,े की महाशिवरात्रीच्या दिवशी वस्त्र दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते.

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner