महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला या गोष्टी अर्पण करा; संपत्ती वाढेल, घरात सुख-समृद्धी येईल
मराठी बातम्या  /  धर्म  /  महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला या गोष्टी अर्पण करा; संपत्ती वाढेल, घरात सुख-समृद्धी येईल

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला या गोष्टी अर्पण करा; संपत्ती वाढेल, घरात सुख-समृद्धी येईल

Feb 25, 2024 03:56 PM IST

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीचा सण जवळ आला आहे. महाशिवरात्रीला शिवलिंगाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे, या दिवशी शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्यास भोलेनाथ प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2024 (AP)

पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला. 

यावर्षी महाशिवरात्री हा सण शुक्रवारी (८ मार्च)) आहे. या दिवशी लोक भगवान शंकराच्या उपासनेत तल्लीन राहतात. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षातील सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी जे काही भक्त भोलेनाथाची खऱ्या भक्तीने पूजा करतात, भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची कृपा मिळवायची असेल, तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जाते. यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भालेनाथाला प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला काय अर्पण केले जावे? ते जाणून घेऊया.

बेलपत्र- शास्त्रात, बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा करणे अपूर्ण मानले गेले आहे. शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि केवळ बेलपत्रच अर्पण करायचे राहिले तर पूजेचे फळ मिळत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा. असे केल्याने तुमच्यावर महादेवाची कृपा होईल.

धोतरा- महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल किंवा जलाभिषेक करत असाल तर भगवान शंकराला धोतरा अवश्य अर्पण करा. शिवलिंगाला धोतरा अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते, तसेच मनाला शांती मिळते.

भस्म- भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात असे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना शिवलिंगाला भस्म नक्की अर्पण करा.

चंदन- शिवलिंग पूजेच्या वेळी भगवान शंकराला चंदनाची पेस्ट लावून तिलक लावण्याची परंपरा आहे. जे लोक शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावतात. त्यांच्या घरात सदैव सुख-समृद्धी नांदते आणि महादेवाच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो.

गंगाजल- महाशिवरात्रीला शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यासाठी गंगाजलाचा वापर करावा. असे केल्याने भगवान भोलेनाथ सर्व वाईट गोष्टी दूर करतील.  शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते.

मध- पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला मधाने अभिषेक केल्याने किंवा अर्पण केल्याने संपत्ती वाढते.

तूप- शिवलिंगावर गायीचे तूप अर्पण केल्याने वंशवृद्धी होते, असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने तुमच्या कुटुंबात सुख-समृद्धी येईल.

शमीची पाने- शिवलिंगावर बेलपत्रासारखी शमीची पाने अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. शिवलिंग पूजेच्या वेळी शमीची पाने अर्पण केल्यास महादेव तुमचे सर्व संकट दूर करतील.

कण्हेरची फूलं - भगवान शिवाला कण्हेरची फूलं फार आवडतात. महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करताना कण्हेरची फूलं अवश्य अर्पण करा आणि महादेवाचा आशीर्वाद घ्या. असे केल्याने सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळते.

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner