मराठी बातम्या  /  धर्म  /  महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवा आणि तसंच करा, आयुष्यात भरभराट होईल

महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवा आणि तसंच करा, आयुष्यात भरभराट होईल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 08, 2024 12:46 PM IST

Mahashivratri 2024 : हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवा आणि तसंच करा, आयुष्यात भरभराट होईल
महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवा आणि तसंच करा, आयुष्यात भरभराट होईल

सनातन धर्मात महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शिवभक्तांसाठी आजचा (८ मार्च) म्हणजेच महाशिवरात्रीचा दिवस खूप खास आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी रात्रीची पूजा आणि जागरण यांचे विशेष महत्त्व आहे. हा सण भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या मिलनाचेही प्रतीक आहे. अशा स्थितीत या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना इच्छित फळ प्राप्त होते.

त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रात या दिवसासंदर्भात काही नियम बनवले आहेत, ज्यांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. 

महाशिवरात्रीला काय करावे?

या दिवशी पूर्ण भक्तिभावाने व्रत पाळावे.

या दिवशी स्नान केल्यानंतर आपले घर आणि मंदिर स्वच्छ करा आणि गंगाजल देखील शिंपडा.

घराच्या ईशान्य दिशेला शंकराची मूर्ती स्थापित करा.

भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र, चंदन, धोतरा, भांग आणि गाईचे दूध अवश्य समाविष्ट करा.

जे व्रत करतात त्यांनी तामसिक गोष्टींपासून दूर राहावे.

या दिवशी कोणाचाही अपमान करणे टाळा.

जे उपवास करतात ते सुका मेवा, फळे, दूध इत्यादी गोष्टींचे सेवन करू शकतात.

या दिवशी पवित्रतेची विशेष काळजी घ्या.

या दिवशी विधीप्रमाणे शिव परिवाराची पूजा करावी.

महाशिवरात्रीला काय करू नये?

भगवान शंकराच्या पूजेदरम्यान केतकीची फुले आणि हळद वापरणे टाळावे.

या दिवशी कांदा, लसूण आणि मसाल्यांच्या सेवनापासून दूर राहा.

महाशिवरात्रीच्या दिवशी मोहरीचे तेल, मसूर आणि वांगी देखील टाळावीत.

या व्यतिरिक्त महाशिवरात्रीच्या दिवशी मांस, अंडी, मद्य आणि तंबाखूचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे.

एवढेच नाही तर महाशिवरात्रीच्या दिवशी पॅकेट ज्यूस वगैरे पिणे टाळावे, कारण त्यात चव वाढवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो, ज्या उपवासात निषिद्ध असतात.

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग