पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला.
यंदा महाशिवरात्री ८ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्री या दिवसासंदर्भात ज्योतिष शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये? याबाबत जाणून घेऊया.
महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर जागरण करावे.
व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ व नवीन वस्त्रे परिधान करावीत.
या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते.
व्रत करणाऱ्याने दिवसभर ‘ओम नमः शिवाय’ हा जप करावा.
व्रत सुरू करण्याआधी उपवास सोडवावा.
उपवास करणाऱ्यांना मदत करा.
व्रताचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सूर्योदय आणि चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा.
भगवान शंकराला बेलपत्र अवश्य अर्पण करा.
पंचामृताने अभिषेक करावा.
कांदा, लसूण, मांस, मद्य इत्यादी तामसिक अन्नापासून दूर राहा.
उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ, डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ टाळावेत.
पूजा करताना शिवलिंगाला नारळपाणी अर्पण करू नये.
पूजेत सिंदूर लावणे टाळावे.
चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नयेत.
कोणाबद्दलही चुकीचे बोलणे टाळा.
मोठ्यांचा अपमान करू नका.
महादेवाला हळद अर्पण करणे टाळावे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या