पंचांगानुसार, दरवर्षी माघ वद्य चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला.
यंदा महाशिवरात्री ८ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्री या दिवसासंदर्भात ज्योतिष शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
अशा स्थितीत ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय केले पाहिजेत.
जर तुम्हाला कालसर्प दोषाने त्रस्त असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार चांदीच्या किंवा तांब्याच्या नाग-नागिणीची जोडी महादेवाच्या मंदिरात किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या. असे केल्याने तुम्हाला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळेल. तसेच जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल. मात्र हा उपाय करण्यापूर्वी सकाळी पवित्र स्नान करावे.
आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ जरूर टाका. यानंतर विधीनुसार महादेवाची पूजा करून नागांची जोडी भगवान शंकराला अर्पण करावी. आणि तुमचे दोष दूर होण्यासाठी भगवान शंकराची मनोभावे प्रार्थना करा.
ओम नागदेवताय नम:
ओम नवकुलया विद्यामहे विषदन्तय धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात्।
ओम क्रौन नमो अस्तु सर्पभ्यो कालसर्प शांती कुरु कुरु स्वाहा || सर्प मंत्र ||
ओम नमोस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वीमनु ये अंतरेस्के ये दिवि तेभ्यः सर्पेभ्यो नमः।
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)