राजस्थानमधील मेवाडचे राजे महाराणा प्रताप सिंग यांची आज जयंती. राजपूत शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचा जन्म ज्येष्ठ शुक्ल तृतीयेला झाला त्यामुळे त्यांची आज तिथीप्रमाणे जयंती साजरी होत आहे. तर ९ मे, १५४० रोजी राजस्थानच्या पाली जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला त्याप्रमाणे ९ मे ला तारखेप्रमाणे त्यांची जयंती साजरी होते. काही ठिकाणी त्यांचे जनस्थळ कुंभलगड असेही नमूद आहे.
महाराणा प्रताप यांचे बालपण भिल्ल समाजासोबत गेले व त्यांच्यासोबतच ते युद्धकला शिकले. वडिलांच्या मृत्युनंतर महाराणा प्रताप यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी मेवाडच्या राजघराण्याची गादी स्वीकारली. राजपदावर बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने त्यांनी राज्यकारभार चालवला.
एक कुशल योद्धा संघटक व राजकारणनिपुण असा राज्यकर्ता म्हणून महाराणा प्रताप यांनी आपला नावलौकिक निर्माण केला. राजस्थानमध्ये महाराणा प्रताप जयंती ही सार्वजनिक सुट्टी आहे. महाराणा प्रताप यांच्या सन्मानार्थ मिरवणुका आणि रॅली काढल्या जातात. उदयपूर आणि चित्तोडगडमध्ये विशेष पूजा आणि उत्सवांसह हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्येही सार्वजनिक सुट्टी असते. त्यांच्या जयंतीनिमित्त खास शुभेच्छा संदेश देऊया.
आपल्या देशावर प्रेम करण्याची आणि
देशाच्या सन्मानासाठी लढण्याची
राणाकडून प्रेरणा घेऊ या
महाराणा प्रताप जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
तसेच विनम्र अभिवादन
…
जो चेतकवर स्वार होऊन ,
शत्रू संघारले होते भाल्याने,
मातृभूमीच्या फायद्यासाठी,
बरीच वर्षे जंगलात घालवली या वीराने.
महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा
..
महान योद्धा आणि राज्यकर्ता
ज्यानी राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी
आपल्या प्राणाची आहुती दिली
पण अधर्मापुढे झुकले नाही.
अशा शूर शिरोमणी महाराणा प्रतापजींच्या
चरणी विनम्र अभिवादन,
महाराणा प्रताप जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
…
हल्दीघाटीच्या लढाईत शत्रूमध्ये खळबळ उडाली होती…
राजपुतानाचे शौर्य पाहून शत्रूही हादरला होता…
अशा शुर वीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त खास शुभेच्छा
…
देशभक्ती आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
…
महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
भारतमातेचा वीरपुत्र, प्रत्येक हिंदुस्थानी माणसाचे लाडके …
कुअर प्रतापजींच्या चरणी नमन..
महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
…
कुशल योद्धा संघटक व राजकारणनिपुण
अशा राजा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा
…
हाराणा प्रताप जी हे अद्भूत शौर्य,
धैर्य आणि दृढनिश्चयाचे अद्वितीय प्रतीक आहेत.
महाराणा प्रताप जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा