Mona Lisa of Mahakumbh: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्याच्या ठिकाणी एक माळा विक्रेता तरुणी तिच्या आकर्षक सौंदर्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. संपूर्ण देशभरात ती मोनालीसा म्हणून प्रसिद्ध झाली होती. इतकेच नाही तर तिची तुलना जगभरातील सौंदर्यवतींशी होऊ लागली होती. मात्र, त्यातून तिला फायदा होण्याऐवजी त्रासच होऊ लागला आणि या त्रासांमुळे सध्या ती चर्चेत आहे. प्रयागराजमध्ये रुद्राक्ष माळा विकतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोनी भोसलेच्या सौंदर्याने, आकर्षणाने आणि चमकणाऱ्या डोळ्यांनी लाखो लोकांची मने जिंकली.
मात्र, तिला प्रसिद्धी देणारे हेच सौंदर्य तिच्या उदरनिर्वाहाच्या मार्गात अडथळा बनल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे कारण म्हणजे मोनीला या प्रसिद्धीसोबत आलेल्या त्रासाने पुरते हैराण केले आहे. प्रयागराजमध्ये रुद्राक्ष माळा विकतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोनी भोसलेच्या सौंदर्याने, आकर्षणाने आणि चमकणाऱ्या डोळ्यांनी लाखो लोकांची मने जिंकली खरी. मात्र, यातून निर्माण झालेल्या त्रासामुळे तिला आपला व्यवसाय गुंडाळण्यावाचून पर्यायच उरलेला नाही.
मोनी सोशल मिडियावर लोकप्रिय झाल्यानंतर तिच्या सौंदर्याने लाखो लोकांना भूरळ घातली. यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी १६ वर्षांच्या या मुलीच्या लूकची तुलना कालातीत आयकॉन मोनालीसाशी केली आणि या मुलीला 'मोनालीसा' असे टोपणनाव दिले. तेव्हापासून ती कुंभमेळ्याची मोनालीसा म्हणून ओळखली जाऊ लागली.
तथापि, अचानक आलेल्या प्रसिद्धीमुळे तिच्या उदरनिर्वाहाच्या क्षमतेत अडथळा निर्माण झाल्यामुळे, 'मोना लिसा'ला मध्य प्रदेशातील तिच्या मूळ गावी इंदूरला परतावे लागले.
सोशल मीडिया वापरकर्ते मोनीला तिच्या आकर्षक पिवळ्या डोळ्यांमुळे, तीक्ष्ण नाकामुळे आणि काळसर रंगामुळे 'तपकिरी सौंदर्य' असे टोपणनाव दिले. या मुलीचे सर्वत्र कौतुक झाले आहे. यामुळे तिच्या उदरनिर्वाहाच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. तिच्याकडून माळा खरेदी करण्याऐवजी, तिला पाहण्यासाठी तिच्या स्टाॅलवर मोठी गर्दी जमा होऊ लागली. याबरोबर सोशल मीडिया सक्रिय असलेले आणि प्रभाव असलेले लोक तिच्या स्टॉलवर फक्त सेल्फी आणि व्हिडिओ क्लिक करण्यासाठी येऊ लागले. यामुळे तिला तिचा रोजचा व्यवसाय करणे कठीण जाऊ लागले. यातूनच तिने शेवटी घरी इंदूरला परतण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या