Mahadev Pooja Vidhi In Marathi: आषाढ महिन्यातील अमवस्या तिथी झाल्यानंतर पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिना हा भगवान महादेवाचा महिना आहे. यंदा श्रावण महिना ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यंदा श्रावण महिन्यात सर्वार्थ सिद्धी योग, प्रीती योग आणि आयुष्मान योगासह अनेक राजयोगही तयार होत आहेत. असे दुर्मिळ योग ७२ वर्षांनंतर घडून येणार असल्याचे मानले जात आहे. पौराणिक कथांनुसार, श्रावण महिन्यादरम्यान भगवान शंकराने समुद्र मंथनातून निघणारे विष धारण केले होते.यामुळे भगवान शिवाचे शरीर तापण्यास सुरुवात झाली होती. भगवान शिवाची ही अवस्था पाहून सगळेच देवदेवता चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी भगवान शिवावर जलाभिषेक सुरू केला. याचचं प्रतीक म्हणून दरवर्षी श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर अर्थात शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. शिवलिंगामध्ये महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाचा म्हणजे, माता पार्वती, भगवान गणेश, कार्तिकेय आणि देवी अशोक सुंदरी यांचा वास आहे. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रसन्न होते.
त्यामुळे या महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. शिवपुराणानुसार शिवलिंगाला केवळ जल अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होऊ शकतात. त्याचबरोबर अनेकवेळा कळत-नकळत आपण जलाभिषेक करताना अनेक चुका करतो. चला जाणून घेऊया शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची योग्य पद्धत आणि नियम:
> भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी किंवा तांबे, चांदी किंवा काचेचे भांडे घ्या.
> शिवलिंगावर जलाभिषेक नेहमी उत्तर दिशेला करावा. उत्तर दिशा ही भगवान शिवाचा डावा अंग मानली जाती, ही जागा पार्वती मातेला समर्पित आहे.
> सर्वप्रथम ज्या शिवलिंगावर गणेशाचे स्थान आहे, त्यामुळे सगळ्यात आधी शिवलिंगाच्या या जलधारीच्या दिशेला पाणी अर्पण करावे.
> आता भगवान कार्तिकेयाचे स्थान मानल्या जाणाऱ्या शिवलिंगाच्या जलधारीच्या डाव्या दिशेला जल अर्पण करा.
> यानंतर भोलेनाथांची कन्या अशोक सुंदरी यांना समर्पित शिवलिंगाच्या जलधारीच्या मधोमध पाणी अर्पण करावे.
> आता देवी पार्वतीचे स्थान मानल्या जाणाऱ्या शिवलिंगाभोवती जल अर्पण करा.
> शेवटी शिवलिंगाच्या वरच्या भागाला जल अर्पण करावे. जे स्वयं महादेव आहेत.
(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या