Maha Kumbh Third Snan 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पौष पौर्णिमेपासून (१३ जानेवारी २०२५) महाकुंभ सुरू झाला आहे आणि २६ फेब्रुवारी २०२५ रोजी संपेल. महाकुंभाचे पहिले शाही स्नान पौष पौर्णिमेला आणि दुसरे शाही स्नान मकर संक्रांतीला (१४ जानेवारी २०२५) झाले. आता महाकुंभाचे तिसरे शाही स्नान मौनी अमावास्येला होणार आहे. यावर्षी मौनी अमावस्या २९ जानेवारी २०२५ रोजी आहे.
महाकुंभ २०२५ शाही स्नान दिनांक-
पौष पौर्णिमा: १३ जानेवारी
मकर संक्रांत : १४ जानेवारी
मौनी अमावस्या : २९ जानेवारी
वसंत पंचमी: ०३ फेब्रुवारी
माघी पौर्णिमा: १२ फेब्रुवारी
महाशिवरात्री : २६ फेब्रुवारी
ब्रह्म मुहूर्त- सकाळी ०५ वाजून २५ मिनिटांपासून ते सायंकाळी ०६ वाजून १८ मिनिटांपर्यंत.
विजय मुहूर्त- दुपारी ०२ वाजून २२ मिनिटांपासून ते ०३ वाजून ०५ मिनिटांपर्यंत.
गोधूली मुहूर्त- सायंकाळी ०५ वाजून ५५ मिनिटांपासून ते ०६ वाजून २२ मिनिटांपर्यंत.
द्रृक पंचांगानुसार, माघ कृष्ण अमावस्या २८ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ०७ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होईल आणि २९ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ०६ वाजून ०५ मिनिटांपर्यंत चालेल.
महाकुंभात शाही स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथांनुसार महाकुंभात शाही स्नान केल्याने आध्यात्मिक शुद्धी, पापांचे प्रायश्चित्त, पुण्य आणि मोक्ष मिळतो. संगमात डुबकी मारल्यास अनेक पटीने अधिक पुण्य मिळते, असे मानले जाते.
प्रयागराज कुंभमेळा २०२५ हा १३ जानेवारीपासून सुरू झाला. हा कुंभमेळा २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत असणार आहे. हा मेळा उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर होत आहे. या मेळ्याला महाकुंभ असेही म्हटले जाते. प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभात साधूंची शिबिरे, सांस्कृतिक परफॉर्मन्स, मेळे आणि बाजारपेठा उभारल्या गेल्या आहेत. प्रयागराज कुंभमेळ्याची ठिकाणे त्रिवेणी संगमाच्या आसपास आहेत. त्यांमध्ये त्रिवेणी संगम, आखाडे आणि तात्पुरते तंबू आणि निवाऱ्याच्या ठिकाणांचा समावेश आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या