Maha Kumbh 2025: भारतीय रेल्वेने जारी केले QR कोड जॅकेट, आता तिकीट बुकिंग होणार एकदम सोपे
मराठी बातम्या  /  धर्म  /  Maha Kumbh 2025: भारतीय रेल्वेने जारी केले QR कोड जॅकेट, आता तिकीट बुकिंग होणार एकदम सोपे

Maha Kumbh 2025: भारतीय रेल्वेने जारी केले QR कोड जॅकेट, आता तिकीट बुकिंग होणार एकदम सोपे

Jan 02, 2025 12:22 PM IST

Maha Kumbha Mela 2025: महाकुंभ मेळ्याला भक्तांना जाणे सोयीचे व्हावे या उद्देशाने भारतीय रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी QR कोड जारी केले आहे. या पद्धतीचा महाकुंभमेळ्याला येण्याची शक्यता असलेल्या सुमारे ४० कोटी भक्तांना त्याचा फायदा होणार आहे.

भारतीय रेल्वेने जारी केले QR कोड जॅकेट, आता तिकीट बुकिंग होणार एकदम सोपे
भारतीय रेल्वेने जारी केले QR कोड जॅकेट, आता तिकीट बुकिंग होणार एकदम सोपे

Maha Kumbh Mela 2025: अलिकडच्याच एका अपडेटमध्ये, भारतीय रेल्वेने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ २०२५ दरम्यान पर्यटकांसाठी तिकीट बुकिंग सोपे करण्यासाठी एक स्मार्ट डिजिटल उपाय आणला आहे. नवीन अपडेटनुसार, रेल्वे कर्मचारी हिरवे जॅकेट घालतील ज्यामध्ये QR कोड असतील. यामुळे भाविकांना UTS अॅप सहजपणे स्कॅन आणि डाउनलोड करता येईल. याद्वारे, रेल्वेला बुकिंग प्रक्रिया सोपी करण्याची आणि तिकीट काउंटरवरील लांब रांगा कमी करता येतील.

या नव्या सेवेबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या

QR कोड जॅकेट

भारतीय रेल्वेने महाकुंभ मेळ्यातील उपस्थितांसाठी त्यांचे रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी एक नवीन, तंत्रज्ञानाने परिपूर्ण असा हा मार्ग सुरू केला आहे. रेल्वे कर्मचारी क्यूआर कोड असलेले हिरवे जॅकेट घालतील, ज्यामुळे भाविक कोड स्कॅन करू शकतील आणि त्यांच्या स्मार्टफोनवर ते थेट अनरिझर्व्ड तिकीट सिस्टम (यूटीएस) अॅप ​​डाउनलोड करू शकतील.

सोपी, व्यवहारकुशल प्रक्रिया

क्यूआर सिस्टीमचा उद्देश तिकीट बुकिंग जलद आणि सोयीस्कर करणे हा आहे. कोड स्कॅन करून, प्रवासी यूटीएस अॅप वापरून डिजिटल पद्धतीने अनारक्षित तिकिटे बुक करू शकतात. यामुळे प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ कमी होतो आणि तिकीट काउंटरवर होणारी प्रचंड गर्दी टाळण्यास मदत होते. यामुळे भाविकांना अधिक सोयिस्कर आणि सुखकारक अनुभव मिळणार आहे.

भाविकांच्या संख्येचे व्यवस्थापन

या महाकुंभ मेळ्याला ४० कोटींहून अधिक भाविक येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेने उचलेले हे पाऊल या अफाट गर्दीचे सक्षमपणे नियोजन करून तिकिटे सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. भारतीय रेल्वेने ३,१२४ विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे. यासोबतच महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी १०,१०० नियमित गाड्या देखील १० जानेवारी ते २८ फेब्रुवारी या काळात सोडण्यात येणार आहेत.

तिकिट काऊंटरची क्षमताही वाढवली

महाकुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता प्रयागराज रेल्वे स्थानकाने उत्तर-मध्य रेल्वे भागात २७८ तिकिट काउंटर सुरू केले आहेत. महाकुंभमेळा सुरू सुरू झाल्यानंतर एका दिवसाला १०,१५,२०० इतके प्रवाशांना हाताळण्याची या तिकिट काउंटर्समध्ये क्षमता आहे.

कॅशलेस सेवा

ही नवी डिजिटल तिकिट प्रणाली देशाच्या डिजिटल इंडियाच्या दिशेने उचलेले एक पाऊल आहे. या पद्धतीमुळे कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्याच प्रमाणे सेवांसाठी मोबाइल अॅप्सच्या वापरास देखील प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे छापील तिकिटे आणि समोरासमोर संवादांवर अवलंबून राहणे कमी होणार आहे. तसेच जलद आणि अधिक कार्यक्षम प्रक्रिया होणार आहे.

१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात पर्यटकांची गर्दी उसळणार आहे. यामुळे डिजिटल तिकीट हे लॉजिस्टिक धोरणाचा एक आवश्यक भाग बनणार आहे. कॅशलेस व्यवहारांना समर्थन देणारा आणि डिजिटल इंडिया मिशनला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम असल्याचे भारतीय रेल्वेने म्हटले आहे.

Whats_app_banner