Mahakumbh Mela 2025 10 Facts In Marathi : उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये १३ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या पवित्र संगमावर लाखो भाविक या उत्सवाला उपस्थित राहून आशीर्वाद घेतील आणि पवित्र स्नान करतील.
दर १२ वर्षांनी होणाऱ्या या महत्त्वाच्या हिंदू उत्सवात यमुना, गंगा आणि सरस्वती नद्यांचा संगम असलेल्या पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी लाखो भाविक येतात. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ २०२५ मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने या खास गोष्टी जाणून घ्या.
महाकुंभ मेळा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम म्हणून ओळखला जातो, यमुना, सरस्वती आणि गंगा नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी जगभरातून भाविक प्रयागराजला येतात.
सोमवार १३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणाऱ्या महाकुंभमेळा २०२५ मध्ये नदीकाठचे ४००० हेक्टर क्षेत्र व्यापले जाईल आणि अंदाजे ६,३८२ कोटी रुपये खर्चासह किमान ४० कोटी पर्यटक येतील असा अंदाज आहे.
कुंभमेळ्याला लाखो लोक हजेरी लावतात त्यामुळे राहण्याची व्यवस्था करणे आणि प्रवासाचे नियोजन अगोदरच करणे आवश्यक आहे. तंबू, मोटेल आणि धर्मशाळांसाठी आपले स्थान आधीच बुकींग करून ठेवणे आवश्यक आहे. शेवटच्या क्षणी किंमतवाढ आणि मर्यादित उपलब्धता टाळण्यासाठी, आपली रेल्वे किंवा विमान तिकिटे आगाऊ खरेदी करा.
१३ जानेवारी २०२५ : पौष पौर्णिमा आणि १४ जानेवारी २०२५ : मकर संक्रांत, पहिले शाही स्नान
२९ जानेवारी २०२५ मौनी अमावस्या, दुसरे शाही स्नान
३ फेब्रुवारी २०२५ : वसंत पंचमी, तिसरे शाही स्नान
१२ फेब्रुवारी २०२५ : माघी पौर्णिमा
२६ फेब्रुवारी २०२५ : महाशिवरात्री, अंतिम स्नान
मोजे, स्कार्फ, हातमोजे, टोपी आणि जाड स्वेटर आठवणीने सोबत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. संगमाच्या सभोवतालचा परिसर बराच थंड असेल, त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालणे महत्त्वाचे आहे. तसेच महाकुंभाच्या काळात अचानक हवामान बदलू शकते, त्यामुळे छत्री घेऊन सज्ज राहा.
प्रयागराज आणि महाकुंभ स्थळावर २,३०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत, जेणेकरून नियंत्रण केंद्रांच्या माध्यमातून लोकसंख्येची घनता विश्लेषण, गर्दी नियंत्रण, घटनेचे वार्तांकन आणि स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यास मदत होईल. इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मेळा क्षेत्रात १,८५० हेक्टर मध्ये १.४५ लाख टॉयलेट आणि ९९ तात्पुरत्या पार्किंग जागा बांधण्याची प्रशासनाची योजना आहे.
ओळखपत्र, आरक्षणाची माहिती, इतर आवश्यक कागदपत्रे, प्रथमोपचार किट, मास्क, हँड सॅनिटायझर, इतर गरजेच्या वस्तू इ.
प्रवचन किंवा आध्यात्मिक प्रवचने भाविकांसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय पौराणिक कथा नाट्य, भक्तीसंगीत, लोकनृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रम मेळ्यात असतात.
महाकुंभस्थळी स्वयंसेवक, पोलिस आणि प्रशासन सतत उपस्थित असतील. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे प्रवास करताना सुलभता आणि सुरक्षितता या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे आहे.
महाकुंभाच्या काळात वाहतूक आणि गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे मुख्य स्थळांना भेट देण्यापूर्वी आपल्या पर्यटनाच्या वेळापत्रकाचा काळजीपूर्वक विचार करा आणि प्रशासनाच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.
या सणाचे महत्त्व हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन हिंदू वाङ्मयात आढळते. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी अमरत्वाच्या अमृताचे थेंब पडलेल्या समुद्र मंथनाची कथा हा त्याचा सर्वात खोल पाया आहे.
संबंधित बातम्या