Maghi Ganesh Jayanti Shubhechha : माघी गणेश जयंती किंवा गणेश जयंती हा गणपतीच्या जन्मोत्सवाचा उत्सव आहे. गणेश जयंती १ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी केली जाईल. माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघी गणेश जयंती बुद्धी, समृद्धी आणि अडथळ्यांवर मात करण्यारी असते. भक्त मनोभावे गणपतीची आराधना करतात ज्यामुळे नम्रता, आध्यात्मिक वाढ आणि नवीन सुरुवातीसाठी आशीर्वाद प्राप्त होते. माघी गणेश जयंतीला तिलकुंड चतुर्थी किंवा वरद चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते, हा दिवस सामुदायिक भावना वाढवतो आणि सांस्कृतिक बंध मजबूत करतो.
माघी गणेश जयंती प्रारंभ तारीख : १ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११ वाजून ३८ मिनिटे ते
माघी गणेश जयंती समाप्ती : २ फेब्रुवारी २०२५ सकाळी ९ वाजून १४ मिनिटे.
पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीगणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती किंवा गणपती बाप्पाचा वाढदिवस साजरा केला जातो. यंदा माघी गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून भद्रा आणि पंचक राहील. गणरायाच्या खास उत्सवानिमित्त माघी गणेश जयंतीच्या आपल्या प्रियजनांना या शुभेच्छा देऊन दिवस आणखी खास करा.
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ,
निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी….
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी..
माघी गणेश जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
…
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे
बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.
माघी गणेश जयंतीनिमित्त शुभेच्छा
…
तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा
…
तूच सुखकर्ता
तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,
बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
…
सुखकर्ता, वरदविनायक,
गणरायाच्या आगमनाने होतो
प्रसन्न सारा आसमंत
अशा या बाप्पाच्या वाढदिवसाच्या
आणि माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छ!
…
तुमची गणेश जयंती आशीर्वादाने,
स्वादिष्ट मोदकांनी आणि
आनंदाच्या क्षणांनी भरलेली जावो.
गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
…
रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
माघी गणेश जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
…
संबंधित बातम्या