दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी या नावांनीही ओळखली जाते. यंदा १३ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी होत आहे.
या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात.
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,
आरोग्य आपणांस लाभो;
ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
…
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी सर्वांना,
माघी गणेश जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
…
तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता,
अवघ्या दिनांचा नाथा,
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे,
चरणी ठेवितो माथा,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
…
गणेश जयंतीचा दिवस आहे खास,
सुख-समृद्ध, ऐश्वर्य आनंद मिळो
बाप्पाच्या चरणी करूया ध्यास
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
…
हार फुलांचा घेऊनी,
वाहु चला हो गणपतीला,
आद्य दैवत साऱ्या जगाचे,
पुजन करुया गणरायाचे,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
…
मोदकांचा प्रसाद केला,
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे,
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
माघी गणेश जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा!
…
श्रींच्या चरणी हात माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे...
माघी गणेश जयंतीच्या अनंत शुभेच्छा!
…
घरोघरी पूजेचे ताट बघती गजाननाची वाट
डोळ्याचं पारन फेडतो मिरवणुकीचा थाट
बसवुनी गणा दाविला नैवेद्य पंचप्राणांचा
वाजच गाजत आली गणरायाची स्वारी
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
संबंधित बातम्या