माघ पौर्णिमेचा दिवस हिंदू धर्मीयांसाठी खूपच खास आणि शुभ मानला जातो. यंदा माघ पौर्णिया शनिवारी (२४ फेब्रुवारी) येत आहे. या विशेष दिवशी भक्त भगवान विष्णूची पूजा करतात आणि सत्यनारायण व्रत करतात. तसेच मंदिरात किंवा घरी विधीवत देवांची पूजा केली जाते.
सोबतच या धार्मिक विधींचा एक अविभाज्य भाग म्हणजे गंगा नदीच्या पवित्र पाण्यात डुबकी घेणे. यासोबतच, या विशेष दिवशी भक्त चंद्र देवाची प्रार्थना करतात आणि त्यांच्याकडे घराच्या समृद्धीसाठी आशीर्वाद मागतात.
पंचांगानुसार, माघ पौर्णिमा २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ०३:३३ वाजता सुरू होईल. तसेच, ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ०५:५९ वाजता संपेल. सनातन धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे, त्यामुळे २४ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी तामसिक भोजन टाळावे. या विशेष दिवशी दारूचे सेवन करू नये.
धार्मिक श्रद्धेनुसार, पौर्णिमेच्या दिवशी तुळशी, आवळा, केळी आणि पिंपळ यांची पाने तोडू नयेत, कारण या वनस्पतींमध्ये भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते.
माघ पौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे, कारण त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो.
माघ पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही केस, नखे इत्यादी कापू नयेत, असे करणाऱ्यांना आर्थिक अडचणीतून जावे लागू शकते.
सोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलणे टाळावे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)