Magh Paurnima in Buddhism: बौद्ध धर्मात माघ पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण मानला गेला आहे. उत्तर प्रदेशातील वैशाली या प्रसिद्ध नगरीत तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. म्हणून या पौर्णिमेस स्मरणदिन असेही म्हणतात. माघ पौर्णिमा बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी आहे.
बौद्ध धर्मात इतर सर्व पौर्णिमांप्रमाणे माघ पौर्णिमेचेही विशेष असे महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्याच दिवशी भगवान गौतम बुद्ध यांनी वैशाली या नगरीत आपला ४५ वा वर्षावास केला होता. त्याच दिवशी त्यांनी स्वत: आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. त्यामुळ माघ पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणण्याची प्रथा आहे.
या दिवशी बौद्ध धर्मीय मोठ्या श्रद्धेने त्रिरसण आणि अष्टशीलाचे पालन करतात. या दिवशी सर्व लहानथोर मंडळी एकत्र जमून वंदना करतात आणि धम्मदेसना ( धर्मोपदेश) ऐकतात.
आपला अंतिम काळ जवळ येत आहे, असे पाहून त्यांनी भिक्खु आनंद यांना हाक मारून सांगितले की, आनंदा, या शालवृक्षांच्या मध्ये कुशीनाराच्या या उपवनात रात्रीत्या तिसऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल. तथागत भगवान गौतम बुद्धांचे हे शब्द ऐकून आनंद म्हणाले की, भगवान, आपण बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, जगाच्या अनुकंपेसाठी तसेच देव व मानवांच्या कल्याणासाठी कल्पान्तापर्यंत राहण्याची कृपा करावी. आनंद यांनी तसी त्रिवार विनंती बुद्धांना केली. त्यावर बुद्ध म्हणाले, बस्स, बस्स, आनंद, तथागतांना अधिक विनवणी करू नको, अशी विनंती करण्याचा समय आता निघून गेला आहे. आनंदा, आता मी वृद्ध झालो आहे. वयस्क झालो आहे. माझा जीवनप्रवास आता संपत आला आहे. माझी वयोमर्यादा आता मी गाठली आहे. माझी ऐंशी वर्षे आता उलटली. ज्या प्रमाणे एखादे जुने शकट वापरून झिजून एखाद्या दिवशी मोडून पडचे तीच अवस्था तथागतांच्या देहाची झालेली आहे. तथागतांनी सांगितल्याप्रमाणे वैशाखी पौर्णिलेला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे उत्तर प्रदेशातील कुशीनारा (आत्ताचे कुशीनगर) येथे रात्रीत्या तिसऱ्या प्रहरी महापरिनिर्वाण झाले.
बौद्ध धर्मात पौर्णिमेला उपोसथ व्रत घेतले जाते. यात अष्टशीलाचा समावेश आहे. या अष्टशीलाचे पालन करणे अत्यंत पवित्र समजले जाते.
१. सजीवांच्या हिंसाचारापासून दूर राहणे.
२. न देता (चोरी न करता) घेण्यापासून परावृत्त राहणे.
३. लैंगिक अनैतिकतेपासून दूर राहणे.
४. खोटे बोलण्यापासून दूर राहणे.
५. सर्व प्रकारचे मद्य आणि इतर मादक पदार्थांचे सेवन न करणे.
६. विकाल काळात (दुपार १२ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत) अन्न वर्ज्य करणे.
७. गाणे, नृत्य, वाद्ये वाजवणे, अश्लील मेळे आणि कार्यक्रमांना उपस्थित न राहणे आणि हार, सुगंधी द्रव्ये आणि शोभेचे दागिने न घालणे..
संबंधित बातम्या