Magh Purnima 2025 In Marathi : हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ पौर्णिमा यावर्षी १२ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. माघ पौर्णिमेचा दिवस स्नान आणि दान कार्यासाठी खास असतो. या दिवशी देवी लक्ष्मी, नारायण आणि चंद्र देव यांची पूजा केली जाते. यासोबतच पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान ही केली जातात.
पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा मंगळवार ११ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी बुधवार १२ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी संपेल. म्हणून उदया तिथीनुसार बुधवार १२ फेब्रुवारी २०२५ ला माघ पौर्णिमा आहे.
धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने साधकाचे सर्व दु:ख आणि क्लेश दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. या दिवशी संकटांपासून मुक्त होण्यासाठी लक्ष्मी-नारायणाच्या अनेक खास मंत्रांचा जप करणे देखील लाभदायक मानले जाते. असे म्हटले जाते की, यामुळे साधकावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा राहते. माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूला प्रसन्न करणारे सोपे मंत्र जाणून घेऊया.
या मंत्रांचा करा जप : माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी, विष्णू आणि चंद्र देव यांची पूजा केली जाते. या दिवशी पूजेदरम्यान या काही सोप्या मंत्रांचा जप करता येतो.
ऊँ नमो नारायणाय
ऊँ नमो भगवते वासुदेवाय
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवाय।।
ऊँ विष्णवे नमः
ऊँ हूं विष्णवे नमः
ऊँ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः
ऊँ श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद
ऊँ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नमः
ऊँ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं सिद्ध लक्ष्म्यै नमः
लक्ष्मी नारायण नमः
ऊँ ऐं क्लीं सोमाय नमः
ऊँ श्रीं श्रीं चन्द्रमसे नमः
ऊँ श्रां श्रीं श्रौं चन्द्रमसे नमः
ऊँ चन्द्रपुत्राय विदमहे रोहिणी प्रियाय धीमहि तन्नोबुधः प्रचोदयात।
ऊँ चं चंद्रमस्यै नमः
संबंधित बातम्या