हिंदू धर्मात माघ महिन्याला खूप महत्व आहे. कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीपासून माघ महिना सुरू होतो. यावर्षी हा महिना २६ जानेवारी २०२४ पासून सुरू झाला. २४ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेच्या दिवशी याची सांगता होईल.
माघ हा महिना खूप महत्त्वाचा आहे, कारण या काळात विविध सण साजरे केले जातात. यासोबतच या महिन्याच्या संदर्भात अनेक नियम बनवण्यात आले आहेत, याचे पालन केलेल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदते.
स्नान, दान इत्यादी आध्यात्मिक कार्यांसाठी माघ महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पौष पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंत माघात स्नान करणे विशेष शुभ आहे. या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
यासोबतच सुख, समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो. हा संपूर्ण महिना श्रीहरी विष्णू आणि भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे.
अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या माघ महिन्यात खरेदी करणे टाळावे. नाणी, चांदीची भांडी, पितळेची भांडी माघ महिन्यात खरेदी करू नयेत, अशी मान्यता आहे. तसेच या महिन्यात मुळा, मद्य, मांस इत्यादींचे सेवन करू नये. जे माघ महिन्यात या नियमांचे पालन करत नाहीत त्यांना आयुष्यभर गरिबीचा आणि विविध अडचणींचा सामना करावा लागतो.
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणत क्लेशनाय गोविंदाय नमो नमः
ओम ह्रीं कार्तवीर्यार्जुनो नम राजा बहु सहस्त्रवाण । यस्य स्मरेण मात्रेन ह्रतं नाष्टम् च लभ्यते ।
शांताकरम भुजगशयनम पद्मनाभम सुरेश विश्वधरम गगनसदृश मेघ रंगीत शुभांगम. लक्ष्मीकांतम् कमलनयनम् योगीभिर्ध्यानागम्यम् वंदे विष्णु भवभयहारम् सर्वलोकैकनाथम्।
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या