Lunar Eclipse And Holi : चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रावर सावली पडते, ज्यामुळे आकाश थोड्या काळासाठी अंधारमय होते. यंदाचे पहिले चंद्रग्रहण होणार असून, ते पाहण्यासारखे असणार आहे. मात्र, भारतभरात साजरा होणारा लोकप्रिय व सर्वात उत्साहात साजरा होणारा सण होळीही याच दिवशी येत आहे. होळी, रंगांचा सण यावर्षी २५ मार्च रोजी साजरा केला जाईल, ज्या दिवशी चंद्रग्रहणही आहे.
२०२४ या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण २५ मार्च २०२४ रोजी होणार आहे. हे छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अपूर्णपणे संरेखित होतात तेव्हा छायाकल्प/पेनम्ब्रल चंद्रग्रहण होते . जेव्हा हे घडते, तेव्हा पृथ्वी सूर्याचा काही प्रकाश थेट चंद्राच्या पृष्ठभागावर येण्यापासून रोखते आणि चंद्राचा सर्व भाग किंवा त्याच्या सावलीच्या बाह्य भागाने झाकून टाकते.
चंद्रग्रहण २५ मार्च रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी सुरू होईल आणि ३ वाजून २ मिनिटांनी संपेल. मात्र, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. परंपरेनुसार चंद्रग्रहण ज्या वेळी होते त्या काळासाठी सूतक काळ पाळला जातो. त्यामुळे सूतक काळात सर्व प्रकारच्या शुभ कार्यांना बंदी आहे. मात्र, तो हे चंद्रग्रहण दिसणार नसल्याने सूतककाळ वैध ठरणार नाही.
हे चंद्रग्रहण आयर्लंड, बेल्जियम, स्पेन, इंग्लंड, दक्षिण नॉर्वे, इटली, पोर्तुगाल, रशिया, जर्मनी, अमेरिका, जपान, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स आणि फ्रान्सच्या काही भागात दिसणार आहे.
पंचागानुसार होळी २४ मार्चला असणार आहे. तर २५ मार्चला धूलिवंदन आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा २४ मार्च रोजी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होईल आणि २५ मार्च रोजी रात्री १२ वाजून ३२ मिनिटांनी समाप्त होणार आहे. सोमवार २५ मार्चला सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी ३ वाजून २ मिनिटापर्यंत असणार आहे. २५ मार्च रोजी चंद्रग्रहणाच्या सावटाखाली होळी धूलिवंदनाचा सण साजरा केला जाणार आहे.
चंद्रग्रहणाची तारीख होळीउत्सवाशी जुळत असल्याने सूतक कालावधीचा विधींवर परिणाम होईल का, अशी चिंता लोकांना सतावत आहे. मात्र, तसे होणार नाही. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने सूतककाळ वैध ठरणार नाही आणि शुभ मुहूर्तात होळीचे विधी आणि पूजा करता येतील. तसेच धूलिवंदनाचा सणही उत्साहात साजरा करता येईल.
संबंधित बातम्या