Chandra Grahan : चंद्रग्रहणावेळी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या काय करावे-काय करू नये-lunar eclipse 2024 what to do or dont during chandra grahan in marathi ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Chandra Grahan : चंद्रग्रहणावेळी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या काय करावे-काय करू नये

Chandra Grahan : चंद्रग्रहणावेळी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या काय करावे-काय करू नये

Sep 17, 2024 11:03 PM IST

Do's and Don't During Chandra Grahan : चंद्रग्रहण ही ज्योतिषशास्त्रात अशुभ घटना मानली जाते. असे मानले जाते की चंद्रग्रहण काळात पूजा आणि शुभ कार्य वर्ज्य आहे. ग्रहणकाळात काही बाबतीत काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. त्याबद्दल जाणून घ्या-

चंद्रग्रहणावेळी काय काळजी घ्यावी
चंद्रग्रहणावेळी काय काळजी घ्यावी

Precautions During Lunar Eclipse 2024 : वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. मात्र, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे देशात सुतक काळाचा नियम लागू राहणार नाही. चंद्रग्रहणाचे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार ग्रहणकाळात शुभ कार्य करू नये, देवी-देवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नये किंवा पूजा करू नये. ग्रहणकाळात तुळशीच्या रोपाला हात लावू नये असे म्हणतात. ग्रहण काळात झाडांना पाणी देणे, जेवणे, बाहेर जाणे किंवा झोपणे टाळावे असे सांगितले जाते. ग्रहणकाळात गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी. जाणून घ्या चंद्रग्रहण काळात कोणती काळजी घ्यावी.

भूकंपाची शक्यता!

हे ग्रहण जगातील मोठ्या देशांमध्ये भूकंप आणेल असे दिसते. ज्या देशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे, तेथे त्याचे ८० ते ९० टक्के विपरीत परिणाम दिसून येतील. ज्या देशांमध्ये चंद्रग्रहण दिसणार नाही, तेथे त्याचा प्रभाव ५० टक्क्यांपर्यंत दिसून येईल असे सांगितले जात आहे.

बुधवारी १८ सप्टेंबर, होणाऱ्या चंद्रग्रहणाचा भारतावर ५० टक्के प्रभाव असेल. याचे मुख्य कारण म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार नाही, कॅलेंडरनुसार या दिवशी चंद्रग्रहण सकाळी ६.११ वाजता होत असून, चंद्रग्रहण सकाळी १०.१७ वाजता संपणार आहे. दृश्यमानते अभावी भारतात सुतक काळाचे वेधादि नियम पाळले जाणार नाही.

चंद्रग्रहणापूर्वी काय करावे -

भारतीय संस्कृतीनुसार, चंद्रग्रहण सहसा नकारात्मक उर्जेशी संबंधित असते, म्हणून या दरम्यान खाणे किंवा पिणे टाळावे. चंद्रग्रहणापूर्वी हलके अन्न खावे. चंद्रग्रहणापूर्वी तुळशीची पाने अन्नपदार्थांमध्ये ठेवावीत आणि ग्रहण संपल्यानंतरच ती काढावीत.

चंद्रग्रहण काळात काय करावे -

असे म्हटले जाते की, ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, त्यामुळे या काळात मंत्रांचा जप करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने ग्रहणाचा दुष्परिणाम होत नाही असे मानले जाते. ग्रहणाच्या वेळी मनापासून आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करावे. या काळात अन्नाचे सेवन टाळावे. असे मानले जाते की ग्रहण काळात झोपू नये. या काळात तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरणे टाळावे.

चंद्रग्रहणानंतर काय करावे -

ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे. प्रार्थनास्थळाची स्वच्छता करावी. चंद्रग्रहणानंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे. देवाची पूजा करावी.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner
विभाग