Chandra Grahan 2024 Date and Sutak Kaal : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे खूप महत्त्व आहे. सर्व ग्रहांमध्ये, सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह आहेत ज्यावर ग्रहण होते आणि ग्रहण कालावधी संदर्भात शास्त्रांमध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असू शकतात, पण ज्योतिषशास्त्रात त्यांचे विशेष महत्त्व आहे.
जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. २०२४ मध्ये दोन चंद्रग्रहण होणार होते, त्यापैकी एक २५ मार्च २०२४ रोजी झाले आहे आणि दुसरे १८ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे.
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण बुधवार, १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. हे सकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी संपेल. हे ग्रहण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला लागेल.
हे ग्रहण दक्षिण अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि पश्चिम युरोपमध्ये दिसणारे चंद्रग्रहण असेल. तसेच ते आफ्रिका, उत्तर-दक्षिण अमेरिका, युरोप, मध्य आशिया, अटलांटिक समुद्र क्षेत्र, हिंदी महासागर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्ये दृश्यमान असेल. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून भारतात दृश्यमान नसल्यामुळे वेधादी नियम पाळू नयेत.
जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. त्यामुळे सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्राचा सावलीचा भाग गडद होतो. जेव्हा आपण पृथ्वीवरून चंद्राकडे पाहतो तेव्हा तो भाग आपल्याला काळा दिसतो. या घटनेलाच चंद्रग्रहण म्हणतात.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या सुतक कालावधीलाही महत्त्व आहे. सुतक कालावधी चंद्रग्रहणाच्या सुमारे नऊ तास आधी सुरू होतो. परंतू हे ग्रहण भारतात दिसणार नाही किंवा ते आंशिक चंद्रग्रहण आहे, त्यामुळे हा सुतक काळ भारतात वैध असणार नाही.
सप्टेंबर २०२४ मध्ये होणारे चंद्रग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण असून, आंशिक ग्रहण असेल. हे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होईल. पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या प्रभावाखाली भाद्रपदातील मीन राशीत ही घटना घडत आहे. या ग्रहणामुळे आर्थिक प्रगतीही होऊ शकते. सरकारी संस्थांमध्येही प्रगती दिसून येईल.
संबंधित बातम्या