Lucky Moles on Body : सामुद्रिक शास्त्रामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीराचे विश्लेषण करून त्याच्याबद्दल अनेक गोष्टी शोधल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरील तीळ पाहून त्याच्या भविष्याबद्दल काही गोष्टींचा अंदाज लावला जाऊ शकतो. अशा स्थितीत आपण येथे व्यक्तीच्या शरीरावरील तीळ कोणते संकेत देतात, ते जाणून घेणार आहोत.
एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर किंवा कपाळाच्या उजव्या बाजूला काळा तीळ आढळल्यास ते खूप शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. तसेच ती व्यक्ती आयुष्यात खूप पैसा कमावते.
समुद्र शास्त्रामध्ये असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या नाभीच्या वर किंवा आसपास तीळ असेल तर ते खूप शुभ मानले जाते. अशा लोकांना आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
स्त्री-पुरुषाच्या ओठांच्या उजव्या बाजूला तीळ असल्यास त्यामुळे त्यांचे जोडीदाराशी प्रेमाचे नाते असते. तर ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असल्यास, जोडीदाराशी मतभेद होतात. तर दुसरीकडे ज्या लोकांच्या खालच्या ओठांवर तीळ लोक त्यांच्या क्षेत्रात चांगले यश मिळवतात.
जर मोठ्या बोटाखाली शनिच्या पर्वतावर तीळ असेल तर त्या व्यक्तीला अपयशाला सामोरे जावे लागते. दुसरीकडे, जर पहिल्या बोटाखाली तीळ असेल तर असे लोक केवळ श्रीमंत होत नाहीत तर त्यांना खूप आदर देखील मिळतो. अशा लोकांना मोठ्या सरकारी नोकऱ्या मिळतात.
ज्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी तीळ असते ते देखील खूप भाग्यवान असतात. अशा लोकांचा आदर आणि सन्मान नेहमी वाढतो. त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीच्या मानेजवळ तीळ असेल तर ते देखील शुभ संकेत मानले जाते. अशा व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
ज्या व्यक्तीच्या नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असतो त्यांना आयुष्यात आर्थिक लाभ होतो. याशिवाय, हे लोक खूप खर्चीकसुद्धा मानले जातात. त्याच वेळी, जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या तळहातावर तीळ असेल तर ते सुख आणि समृद्धीच्या आगमनाचे लक्षण असू शकते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े
संबंधित बातम्या