मराठी बातम्या  /  धर्म  /  Love Horoscop : रिलेशनशिप-ब्रेकअपसाठी हे ४ ग्रह ठरतात कारणीभूत! ग्रहदोष दूर करून टिकवा नातं

Love Horoscop : रिलेशनशिप-ब्रेकअपसाठी हे ४ ग्रह ठरतात कारणीभूत! ग्रहदोष दूर करून टिकवा नातं

HT Marathi Desk HT Marathi
Jun 04, 2024 12:37 PM IST

Love Horoscop : जोतिष अभ्यासानुसार या व्यक्तीच्या कुंडलीत काही महत्वाचे ग्रह कमजोर असल्याने त्यांना नात्यात दुरावा आणि ब्रेकअपसारखे त्रास वाट्याला येतात.

Love Horoscop : रिलेशनशिप-ब्रेकअपसाठी हे ४ ग्रह ठरतात कारणीभूत! ग्रहदोष दूर करून टिकवा नातं
Love Horoscop : रिलेशनशिप-ब्रेकअपसाठी हे ४ ग्रह ठरतात कारणीभूत! ग्रहदोष दूर करून टिकवा नातं

वैदिक मान्यतेनुसार प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात जोतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र या बाबी अत्यंत महत्वाच्या असतात. यामध्ये जोतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्र लोकांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात. ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलांचा परिणाम व्यक्तीच्या लव लाईफवरसुद्धा दिसून येतो. ग्रहांच्या स्थितीनुसार नातेसंबंधातील बदल घडून येतात अशी मान्यता आहे. अनेक लोकांना कुंडलीतील कमजोर ग्रहांमुळे नात्यात दुरावा सहन करावा लागतो.

ट्रेंडिंग न्यूज

जोतिषशास्त्रात ९ ग्रहांना प्रचंड महत्व आहे. या ग्रहांच्या हालचाली प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगले-वाईट अनुभव देण्यासाठी कारणीभूत ठरतात. ग्रहांच्या स्थितीमुळे काही लोकांच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचे प्रसंग अनुभवायला मिळतात. काही जोडपी अशी असतात ज्यांना लव लाईफमध्ये किंवा वैवाहिक आयुष्यात प्रचंड प्रेम आणि सुख प्राप्त होते. तर काही जोडपी अशी असतात ज्यांना लव लाईफमध्ये वैवाहिक आयुष्यात प्रचंड त्रास आणि अडचणी सहन कराव्या लागतात. जोतिष अभ्यासानुसार या व्यक्तीच्या कुंडलीत काही महत्वाचे ग्रह कमजोर असल्याने त्यांना ब्रेकअपसारखे त्रास वाट्याला येतात. पाहूया हे ग्रह नेमके कोणते आहेत.

सूर्य

आपल्या आयुष्यात सूर्य या ग्रहाचा थेट संबंध वडील आणि वडीलधाऱ्या व्यक्तींशी जोडलेला असतो. जर तुमच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत तुमचे खटके उडू शकतात. यानुसार तुमच्या जोडीदाराच्या वडिलांसोबत अथवा भावासोबत तुमचे वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या नात्यावर याचा वाईट परिणाम होऊन नाते संपुष्ठात येउ शकते.

शुक्र

शुक्र हा ग्रह तुमच्या लव लाईफमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. शुक्र ग्रहाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुमच्या कुंडलीत जर शुक्र कमजोर असेल तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या आयुष्यात दिसून येईल. सरी कमजोर असल्याने तुमचे तुमच्या जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होतील. एकमेकांशी पटवून घेणे कठीण होईल. आणि त्यामुळे तुमचा ब्रेकअप होण्याची शक्यता असते. त्यामुळे शुक्र कुंडलीत ग्रहाला मजबूत करण्यासाठी जोतिषांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

बुध

अनेक लोकांची लव लाईफ बिघडण्यामागे बुध ग्रहाचीसुद्धा महत्वाची भूमिका असते. जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंदात ठेवण्यात अपयशी ठरता. तसेच त्यांना आवश्यक असलेला आदर आणि मानसन्मान देण्यात कमी पडता. त्यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडायला सुरु होतात. नात्यात दुरावा आल्याने अनेकवेळा ब्रेकअपसुद्धा होते. त्यामुळेच रिलेशनशिप आणि ब्रेकअपमध्ये बुध ग्रहाचा महत्वाचा प्रभाव असतो.

बृहस्पती

सूर्य, शुक्र, बुधप्रमाणेच नातेसंबंध तुटण्यामागे बृहस्पतीसुद्धा कारणीभूत ठरु शकते. विवाह आणि प्रेमसंबंध जोडण्यात आणि टिकवण्यात बृहस्पती देव महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळेच तुमच्या कुंडलीत जर बहृस्पती कमजोर असेल तर ते नाते दीर्घकाळ टिकणे कठीण असते. अशा नात्यामध्ये अनेक अडचणी येऊन ते नाते संपुष्ठात येते. त्यामुळे अशा लोकांना जोतिषांचा सल्ला घेऊन बृहस्पती ग्रह मजबूत करण्यावर भर दयायला हवा.

WhatsApp channel