सध्या संपूर्ण भारत देश राममय झाला आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक अयोध्येत पोहोचत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली होती. प्रभू रामाच्या याच बालस्वरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे आहे. काळ्या पाषाणात बनलेली मुर्ती खूपच आकर्षक आहे. गुरुवारी (१८ जानेवारी) मंत्रोच्चारात या मूर्तीची मंदिराच्या गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी या मूर्तीचे डोळे पिवळ्या कापडाने झाकून मूर्तीवर गुलाबाच्या फुलांचा हार घालण्यात आला होता. ५१ इंच उंचीच्या या मूर्तीशी संबंधित काही खास गोष्टी येथे जाणून घेणार आहोत.
१) रामलल्लाची ही मूर्ती कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. ती एकाच दगडापासून बनवली आहे, म्हणजेच मूर्तीच्या दगडात दुसरा दगड जोडलेला नाही.
२) या मूर्तीचे वजन सुमारे २०० किलो आहे. मूर्तीची उंची ४.२४ फूट आणि रुंदी तीन फूट आहे. ही मूर्ती भगवान श्री रामाचे ५ वर्षांचे बालस्वरूप दाखवते.
३) रामलल्लाच्या या सुंदर मूर्तीमध्ये विष्णूचे १० अवतार पाहायला मिळतात. या मुर्तीत मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की हे १० अवतार आहेत.
४) मूर्तीभोवती असलेल्या फलकावर एका बाजूला हनुमानजी आणि दुसऱ्या बाजूला गरूड आहे. यामुळे पुतळ्याच्या भव्यतेत भर पडते.
५) रामलल्लाच्या या मूर्तीमध्ये मुकुटाच्या बाजूला सूर्यदेव, शंख, स्वस्तिक, चक्र आणि गदा दिसते. मूर्तीच्या मुकुटामागे सूर्यदेव आहे जे भगवान रामाचे कुलदैवत आहे.
६) मूर्तीमध्ये रामलल्लाचा डावा हात धनुष्यबाण धरण्याच्या मुद्रेत दाखवला आहे. मात्र, अद्याप मूर्तीवर धनुष्य-बाण बसविण्यात आलेले नाही.
७) काळ्या पाषाणापासून बनवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीमध्ये भगवान श्रीरामाची अतिशय आकर्षक प्रतिमा दिसते, जी सर्वांना आकर्षित करत आहे.
८) ही मूर्ती काळ्या रंगाच्या दगडापासून बनवण्यात आली आहे. श्यामल शिलाचे (काळ्या पाषाणाचे) वय हजारो वर्षे असते, ते जलरोधकही असते.
९) मूर्ती ५ वर्षांच्या मुलाची कोमलता दर्शवते. चंदन, रोळी इत्यादी लावल्याने मूर्तीच्या चकाकीवर परिणाम होत नाही.
१०) रामलल्लाची ५१ इंच उंच मुर्ती दक्षिण भारतीय शैलीची आहे. ही मुर्ती लोकांना दुरून पाहता यावी म्हणून उभ्या स्थितीत ठेवण्यात आली आहे.