आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. तसेच आजचा दिवस आणखी एका कारणाने अत्यंत खास आहे. आज वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असणार आहे. दरवर्षी २१ जून रोजी सर्वात मोठा दिवस पाहायला मिळतो. याचे कारण नेमके काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. दिल्ली किंवा उत्तर भारतात आजचा दिवस सहसा किती तासांचा असतो हे तुम्हाला माहिती आहे का? सामान्यतः जेव्हा दिवस आणि रात्र समान असतात, तेव्हा ते प्रत्येकी 12 तासांचे असतात. परंतु २१ डिसेंबरनंतर, रात्री लहान आणि दिवस मोठे व्हायला सुरुवात होते. त्यानुसार सर्वात मोठा दिवस २१ जून आहे. २१ जूननंतर दिवसाची लांबी हळूहळू कमी होऊ लागते. दरम्यान २१ जून २०२४ रोजी दिवस किती तासांचा असणार आहे? हे पाहणे महत्वाचे आहे. हा दिवस तब्बल १४ तासांचा असणार आहे.
हा एक असा दिवस आहे जेव्हा पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते आणि सूर्याची किरणेदेखील पृथ्वीवर जास्त काळ राहतात. त्यामुळेच हा दिवस सर्वात मोठा असतो. याबाबत आणखीन सांगायचे झाले तर, जेव्हा सूर्याची किरणे कर्कवृत्ताच्या उष्ण कटिबंधावर थेट पडतात तेव्हा असे घडते. सध्या, पृथ्वीच्या या भागात सूर्याकडून मिळणारी ऊर्जा ३० टक्के अधिक असते. २१ जूनचा दिवस खासकरुन विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात असणाऱ्या देशांतील लोकांसाठी सर्वात मोठा दिवस आहे. यामध्ये रशिया, उत्तर अमेरिका, युरोप, आशिया आणि काही प्रमाणात आफ्रिकेचादेखील समावेश यामध्ये होतो.
खगोलशास्त्रानुसार, पृथ्वी २४ तासांत आपली प्रदक्षिणा पूर्ण करते. त्यामुळे दिवस आणि रात्र घडून येत असतात. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात. वास्तविक जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि तुम्ही त्याभागात सूर्याकडे तोंड करत असता तेव्हा तुम्हाला दिवस दिसतो. जर तुम्ही सूर्यापासून दूर असलेल्या बाजूला तोंड करता तेव्हा तुम्हाला रात्र दिसते.
हिंदू पंचांगानुसार हा दिवस ग्रीष्म संक्रांती किंवा कर्क संक्रांती म्हणून साजरा केला जातो. हिंदू परंपरेनुसार हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी शुभ मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने चांगले फळ मिळते. यादिवशी पृथ्वीचा अक्षीय कल सूर्याकडे अधिक असतो. त्यामुळे दिवसाचा कालावधी वाढतो. पंचांगानुसार, आज २१ जून २०२४ रोजी सूर्योदय सकाळी ५ वाजून २३ मिनिटांनी झाला आहे. तर आज सूर्यास्ताची वेळ सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी आहे.
खगोलशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, आज दुपारी काही क्षणासाठी आपली सावली गायब होते.यामागचे वैज्ञानिक कारण असे आहे की, या काळात सूर्य कर्क राशीवर स्थित असतो. म्हणजेच सूर्य कर्क उष्ण कटिबंधाला पूर्णपणे लंब आकारात असतो. त्यामुळे त्याचा प्रकाश थेट पृथ्वीवर पडतो आणि त्यामुळे काही क्षणासाठी आपली सावली पडत नाही.
संबंधित बातम्या