लोकमान्य केशव अर्थात बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरीत एका ब्राम्हण परिवारात झाला. त्यांचे शिक्षण डेक्कन कॉलेज, पूणे येथे झाले. कायद्याची पदवीही घेतली, पण या व्यवसायात हात घातला नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले.
तुरुंगात असताना त्यांनी हिंदूंचा पवित्र ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता - कर्मयोग रहस्य यावर भाष्य लिहिले. जाणकारांनी त्याचे खूप कौतुक केले. हे वाचून हिंदू-धार्मिक ग्रंथांवर त्यांची खोलवर पकड होती असे दिसते. टिळक त्यांच्या क्रांतिकारी विचारांसाठी प्रसिद्ध होते. भारताच्या अशा या शूर स्वातंत्र्यसैनिकाचे १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबईत निधन झाले.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी भीमगर्जना करणारे थोर पत्रकार, स्वातंत्र्यसेनानी, निर्भिड वक्ता, प्रखर राष्ट्रवादी असणाऱ्या लोकमान्य टिळकांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करूया.
स्वराज्य हा तर माझा जन्मसिध्द अधिकार आहे
आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करून
इंग्रज सरकारला हादरून सोडणारे
थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या
जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
…
महान स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा।
…
महान कार्ये कधीही सोपे नसतात आणि सहज होणारे कार्ये महान नसतात
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जंयती
त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
…
सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची,
जाणीव करून देणारे स्वतंत्रसेनानी,
पत्रकार व थोर समाजसेवक..
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन
कारण पुस्तके जिथे असतील
तिथे स्वर्ग निर्माण होते
- लोकमान्य टिळक
…
कठीण काळ, धोके आणि
अपयशाची भीती टाळण्याचा प्रयत्न करू नका.
ते तुमच्या मार्गात नक्कीच येतील
- लोकमान्य टिळक
…
जुलूम सहन करणे म्हणजे
सोशिकपणा नव्हे
तो परमार्थही नव्हे
ती फक्त पशुवृत्ती होय
- लोकमान्य टिळक
…
परमेश्वर अस्पृश्यता मानत असेल तर
मी परमेश्वरालाच मानणार नाही
- लोकमान्य टिळक
…
मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला
तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय
देशाची उन्नती होत नाही
- लोकमान्य टिळक
…
माणसाने माणसाला भ्यावे
ही शरमेची गोष्ट आहे
- लोकमान्य टिळक
…
जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते
तिथे श्रद्धेचे क्षेत्र सुरु होते
- लोकमान्य टिळक
संबंधित बातम्या