फार प्राचीन काळापासून ऋतू आणि कॅलेंडर यांचा मेळ घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऋतू आणि कॅलेंडरमधील तारखा यांमध्ये फार अंतर पडू नये यासाठी दरवर्षी पडणारा पाव दिवसांचा फरक लीप वर्षामध्ये भरुन काढला जातो.
पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात हे सर्वांनाच माहित आहे. पण खरंतर, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५.२४२ दिवसांचा काळ लागतो. ०.२४२ या वेळ आपण धरत नाही. दर ४ वर्षांनी या वेळेचे मिळून २४ तास होतात. म्हणजे एक पूर्ण दिवस. हा एक दिवस वाढल्याने फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा होतो. लीप वर्ष सोडले तर इतर वर्षी फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा होतो.
प्राचीन काळी रोमन साम्राज्यात चांद्रमासावर आधारित कॅलेंडर वापरले जाई. चांद्रमासावर आधारित वर्षात ३५५ दिवस असतात आणि सौरवर्षात ३६५ दिवस असतात. त्यामुळे भारतीयांप्रमाणे रोमन साम्राज्यातले लोक हा फरक दर चार वर्षांनी एक महिना वाढवून कॅलेंडर नीट करत.
पण मोठा विस्तार असलेल्या रोमन साम्राज्यात ही व्यवस्था सर्वत्र पाळणे कठीण जाई. धार्मिक नेते किंवा स्थानिक सुभेदार कॅलेंडरचे निर्णय आपापल्या मनाप्रमाणे घेत. त्यामुळे ज्युलियस सीझरने इसवीसनपूर्व ४६ व्या वर्षी कॅलेंडर सुधारणेचा हुकुमनामा काढला. त्याने सुचवलेल्या सुधारणेनंतर त्या कॅलेंडरला ज्युलियन कॅलेंडर म्हटले जाऊ लागले.
कालमापन चांद्रवर्षाऐवजी सौरवर्षावर आधारित करावे. वर्षभरात ३६५.२५ दिवस असले तरी व्यवहारासाठी प्रत्येक वर्षात ३६५ दिवस असावेत. ०.२५ दिवसांचा फरक भरुन काढण्यासाठी दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात १ दिवस वाढवावा. अशाप्रकारे वर्षातील सरासरी दिवसांची संख्या ३६५.२५ झाली.
सोळाव्या शतकापर्यंत ज्युलियन कॅलेंडरमध्ये १२ दिवसांची भर पडली. ख्रिश्चन धार्मिक सण आणि ऋतूचक्रामध्ये फरक पडू लागला. त्यामुळे सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात पोप ग्रेगरीने काही सुधारणा केल्या. त्याच्या कॅलेंडरला ग्रेगरिअन कॅलेंडर म्हटलं जातं.
पोप ग्रेगरीने १५८२ या वर्षातील ऑक्टोबरमहिन्यातून १२ दिवस वजा केले. ज्या वर्षाला ४ ने भाग जातो त्याला लीप वर्ष मानले जावे. त्यात ३६६ दिवस असतील.
उदा, २०२० व २०२४ या आकड्यांना ४ किंवा ४०० ने भाग जातो. २०२४ नंतर असेच; २४०० हे ४०० वे लीप वर्ष आहे, त्याचप्रमाणे २१००, २२००, २३०० हे लीप वर्ष असणार नाहीत. कारण हा फरक अतिरिक्त "५ तास ४८ मिनिटे ४५ सेकंद" मुळे आहे. एका वर्षाची लांबी ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे आणि ४५ सेकंद असते.
संबंधित बातम्या