Friday Laxmi Puja : हिंदू धर्म आणि संस्कृतीत शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवतेला समर्पित मानला जातो. कारण शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा केल्यास व्यक्तीला धनप्राप्ती होत असल्याचं मानलं जातं. परंतु पूजा करताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. शुक्रवारी लक्ष्मीमातेचे व्रत केल्यास भक्तांना लक्ष्मी देवीचा आशिर्वाद मिळत असतो. त्यामुळं शुक्रवारी सकाळी आणि संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केल्यास त्यामुळं आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते.
लक्ष्मीमातेची पूजा करत असताना तिच्या आवडत्या वस्तू म्हणजेच कमलगट्टा, कमळाचं फूल, लाल गुलाब आणि पांढरी मिठाई या वस्तू अर्पण करायला हव्या. त्यामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांना आशिर्वाद देते. श्रीयंत्राची पूजा विधीनुसार शुक्रवारी करावी. त्यामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होते. शुक्रवारी विधिपूर्वक श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीची पूजा करा, त्यानंतर श्रीसूक्ताचे पठण करा. यामुळे पैशाचे संकट दूर होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.
शुक्रवारी लक्ष्मी स्त्रोत पाठ केल्यामुळं व्यक्तीला पैशांची कमतरता जाणवत नाही. त्यामुळं तुम्ही आर्थिक संकटात असाल तर दर शुक्रवारी लक्ष्मी स्त्रोत पाठ करण्याचा प्रयत्न करा. कुंडलीतील शुक्र बलवान होण्यासाठी या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करा, अत्तर लावा, स्वच्छता ठेवा आणि स्त्रियांचा आदर करा. यासोबतच या दिवशी पांढरे वस्त्र, तांदूळ, तूप, कापूर, साखर, श्रृंगाराचे साहित्य, दही इत्यादींचे दान करणेही अत्यंत लाभदायक मानले जाते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)