Lalita Panchami : ललिता पंचमीनिमित्त प्रियजणांना हे शुभेच्छा संदेश द्या, लाभेल सुख-समृद्धी
मराठी बातम्या  /  धर्म  /  Lalita Panchami : ललिता पंचमीनिमित्त प्रियजणांना हे शुभेच्छा संदेश द्या, लाभेल सुख-समृद्धी

Lalita Panchami : ललिता पंचमीनिमित्त प्रियजणांना हे शुभेच्छा संदेश द्या, लाभेल सुख-समृद्धी

Published Oct 07, 2024 10:08 AM IST

Lalita Panchami 2024 Wishes In Marathi : नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसातील पाचव्या दिवशी म्हणजेच आश्विन शुक्ल पंचमीला ललिता पंचमी व्रत केले जाते. ललिता पंचमीनिमित्त प्रियजणांना या शुभेच्छा देऊन दिवसाचा आनंद द्विगुणीत करा आणि जाणून घ्या पूजा पद्धत.

ललिता पंचमी २०२४ शुभेच्छा आणि पूजा-पद्धत
ललिता पंचमी २०२४ शुभेच्छा आणि पूजा-पद्धत

ललिता पंचमी म्हणजे आश्विन शुक्ल पंचमी ला उपांग ललिता व्रत करावयाचे व्रत आहे. हे काम्य व्रत आहे. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. देवी ललिताने कामदेवाच्या राखेपासून जन्मलेल्या भंडा राक्षसाचा पराभव केला होता असे सांगितले जाते. सोमवार ७ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी साजरी होत असून, आपल्या प्रियजणांना या दिवसाच्या खास शुभेच्छा पाठवा आणि जाणून घ्या ललिता पंचमीची पूजा पद्धत.

ललिता पंचमीच्या शुभेच्छा

नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम।

भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्।।

शुभ ललिता पंचमी

कमलावर अधिष्ठित,

निळे, रेशमी वस्त्र परिधान करणारी,

सुवर्णकांतीची, भक्तांना नित्य वर देणारी

अशा ललिता देवीचे मी चिंतन करतो...

ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

ललिता देवीच्या कृपेने लाभेल उत्तम आरोग्य,

पूर्ण होईल सर्व इच्छित ईच्छा

ललिता पंचमीच्या मंगलमय शुभेच्छा

तुम्ही नेहमी नकारात्मकतेपासून दूर राहा,

सदैव आनंदी राहो.

ललिता पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा

नवरात्रीचे नऊ दिवस,

सण हा मांगल्याचा..

ललिता देवीच्या कृपेने

आपले सर्व काम पूर्ण व्हावे

ललिता पंचमीच्छा हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या मंगल समयी

ललिता देवी तुम्हाला सुख, समृद्धि 

आणि ऐश्वर्य प्रदान करो…

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…

हीच देवीला प्रार्थना…

ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…

ललिता पंचमी पूजा पद्धत

ललिता देवी यांना समर्पित या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. स्नान करून ध्यान करावे आणि त्यानंतर ललिता पंचमी व्रताची संकल्पना घ्यावी. केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर बांधतात. एखाद्या करंडकाचे झाकण हे ललिता देवीचे प्रतीक मानून पूजेला घेतात. लक्षात ठेवी की, पूजेच्या वेळी तुमचा चेहरा उत्तर दिशेला असावा.

सर्व प्रथम भगवान श्री गणेश, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा आणि नंतर मातेची पूजा करा. तसेच सुख-समृद्धीसाठी त्यांचे आशीर्वाद मागा. त्यानंतर माता ललिता यांच्या फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा, देवीची आरती करा आणि ललिता सहस्रावलीचे पठण करा. 

या पूजाविधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षता युक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवैद्यासाठी लाडू, वडे, घारगे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या शेवटी घारग्यांचे वायन (वाण) देतात. रात्री जागरण व कथा श्रवण करतात. दुसऱ्या दिवशी ललितादेवीचे विसर्जन करतात.

 

Whats_app_banner