Lakshmi Pujan Wishes : दिवाळी व लक्ष्मी पूजनानिमित्त प्रियजणांना द्या हे हटके शुभेच्छा संदेश
मराठी बातम्या  /  धर्म  /  Lakshmi Pujan Wishes : दिवाळी व लक्ष्मी पूजनानिमित्त प्रियजणांना द्या हे हटके शुभेच्छा संदेश

Lakshmi Pujan Wishes : दिवाळी व लक्ष्मी पूजनानिमित्त प्रियजणांना द्या हे हटके शुभेच्छा संदेश

Published Oct 31, 2024 09:08 AM IST

Lakshmi Pujan 2024 Wishes : आज नरक चतुर्दशी असून, उद्या लक्ष्मी पूजन म्हणजेच दिवाळी आहे. या शुभ मुहूर्तावर आपण लक्ष्मी, गणेश यांच्या भक्तिमय शुभ संदेशांद्वारे दिवाळीच्या दिवशी आपल्या प्रियजनांना काही खास संदेश पाठवू शकता.

दिवाळीच्या शुभेच्छा, लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा
दिवाळीच्या शुभेच्छा, लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा

हिंदू धर्मात दिवाळी या सणाला खास महत्व आहे. दरवर्षी आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते, परंतु यावर्षी पंचांगातील तिथीच्या वेळेमुळे दोन दिवसांची दिवाळी साजरी केली जात आहे. देशात आज ३१ ऑक्टोबर रोजी बहुतांश ठिकाणी दिवाळी साजरी केली जात आहे. तर महाराष्ट्रासह काही ठिकाणी १ नोव्हेंबरला लक्ष्मी पूजन केले जाईल आणि दिवाळी साजरी केली जाणार आहे. 

दिवाळीचा सण लोकांच्या जीवनात आनंद आणि उत्साह घेऊन येतो. नात्यांमध्ये, प्रियजनांशी असलेल्या प्रेमाची आणि विश्वासाची आठवण करून देते. दिवाळीचा सण हा प्रमुख सणांपैकी एक आहे. याच दिवशी प्रभू श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते. या आनंदात शहरातील नागरिकांनी दीपप्रज्वलन करून प्रभू रामाचे स्वागत केले. तेव्हापासून दीपप्रज्वलन करून दिवाळी सण साजरा केला जात आहे. दीपोत्सवाच्या खास निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजणांना, कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना खास मॅसेजच्या माध्यमातून शुभेच्छा पाठवू शकता. 

लक्ष्मी पूजनाच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा

गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व अडथळे दूर होवो,

देवी लक्ष्मीकडून धन आणि वैभवाचा आशीर्वाद मिळो,

प्रत्येक दु:खातून मुक्ती मिळो, जीवन आनंदाने भरून जाओ.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

या दिवाळीत

तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो, 

तुमची सर्व इच्छा पूर्ण होवोत, 

प्रत्येक दिवस प्रकाशाने भरून जावो

दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा

रांगोळीच्या सप्तरंगात

सुखाचे दीप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी

घर सुख-समृद्धीने भरू दे

लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

दिवाळीत लक्ष्मी-गणेशाच्या कृपेने

प्रत्येक अंधार दूर होऊन जीवनात नवा प्रकाश यावा

हीच सदीच्छा...

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवा लावा, मंदिर सजवा,

घराचा प्रत्येक कोपरा उजळून टाका,

भजन-कीर्तन आणि मंत्रांनी भगवंताचे नाव घ्या, 

प्रभू रामाच्या आगमनावर शुभगीते म्हणा,

दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

या दिवाळीत देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रेम, 

सुख-समृद्धीचा दीप प्रज्वलित करो. 

तुमच्या जीवनातील आनंद अफाट राहो. 

लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीचा हा शुभ सण तुमच्या जीवनात 

नवीन प्रकाश आणि आनंद घेऊन येवो. 

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

महालक्ष्मीचे करुनी पूजन,

लावा दीप अंगणी

धनधान्य आणि सुख-समृद्धी,

लाभेल तुम्हा जीवनी

लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!

दिव्याचा प्रकाश, फटाक्यांचा आवाज,

सूर्यकिरण, आनंदाचा वर्षाव,

चंदनाचा सुगंध, प्रियजनांचे प्रेम

दिवाळीच्या व लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Whats_app_banner