मराठी बातम्या  /  धर्म  /  Pithori amavasya : यंदाची पिठोरी अमावस्या आहे खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

Pithori amavasya : यंदाची पिठोरी अमावस्या आहे खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

HT Marathi Desk HT Marathi
Sep 13, 2023 02:32 PM IST

Pithori amavasya 2023 : उद्या, १४ सप्टेंबर रोजी पिठोरी अमावस्या तथा भाद्रपद अमावस्या आहे. काय आहे मुहूर्त आणि पूजा विधी?

Pithori Amavasya
Pithori Amavasya

Pithori amavasya 2023 : भाद्रपद महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या साजरी करतात. हे एक प्रकारचं व्रत आहे. पिठोरी अमावस्येला भाद्रपद अमावस्या किंवा कुशग्रहणी अमावस्या असं देखील म्हणतात. यंदाची पिटोरी अमावस्या उद्या, १४ सप्टेंबर २०२३ रोजी साजरी होईल. 

ट्रेंडिंग न्यूज

या दिवशी धार्मिक कार्यासाठी कूश गोळा केला जातो. त्यामुळं या अमावस्येला कुशग्रहणी असं म्हटलं जातं. या दिवशी गंगास्नान, दान आणि तर्पण अशा कार्यांना विशेष महत्त्व असतं. या अमावस्येनंतरच हिंदू धर्मात अत्यंंत महत्त्वपूर्ण असलेल्या पितृपक्षाची सुरुवात होते. यंदाच्या अमावस्येचा योग्य मुहूर्त काय आहे आणि पूजाविधी कसा करावा याबद्दल जाणून घेऊया.

पिठोरी अमावस्येची योग्य वेळ?

पिठोरी अमावस्या १४ सप्टेंबर रोजी सकाळी ४.४८ पासून सुरू होईल आणि १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०९ मिनिटांनी समाप्त होईल. पिठोरी अमावस्येला पिठापासून ६४ देवांच्या मूर्ती बनवण्याची व त्याची पूजा करण्याची परंपरा आहे.

प्रदोष वज्र पूजेचा शुभ मुहूर्त

अमावस्या तिथीला प्रदोष काळात पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:२८ ते ८.४७ या काळात पिठोरी प्रदोष व्रत मुहूर्त असेल. तसेच दोन तास वीस मिनिटांचा कालावधी शुभ मुहूर्ताचा असणार आहे.

अशी करा पूजा

पिठोरी अमावस्येला सुवासिनी स्त्रियांच्या व्रताचं महत्त्व विशेष असतं. सूर्यास्तापूर्वी स्नान केलं जातं. तसंच, चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदांची पूजा केली जाते. खीर पुरी, पुरणपोळी, साटोरी असे पदार्थ नैवेद्य म्हणून करावेत.

मातृदिनही म्हटले जाते! 

पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी आर्वजून व्रत करतात. धन देवतांच्या पूजेसह संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी आवर्जून व्रत करतात. आईनं मुलांसाठी करायचं हे व्रत आहे. कदाचित म्हणूनच या दिवसाला मातृदिन असंही म्हटलं जातं.

WhatsApp channel
विभाग