Kojagiri Purnima Wishes : कोजागरी पौर्णिमेनिमित्त प्रियजणांना हे शुभेच्छा संदेश पाठवून दिवस गोड करा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Kojagiri Purnima Wishes : कोजागरी पौर्णिमेनिमित्त प्रियजणांना हे शुभेच्छा संदेश पाठवून दिवस गोड करा

Kojagiri Purnima Wishes : कोजागरी पौर्णिमेनिमित्त प्रियजणांना हे शुभेच्छा संदेश पाठवून दिवस गोड करा

Updated Oct 14, 2024 11:01 AM IST

Kojagiri Purnima 2024 Wishes In Marathi : हिंदू धर्मात प्रत्येक सण-उत्सवाचे खास महत्व आहे. आश्विन पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा साजरी करतात, चंद्रप्रकाशातील दूध कोजागरीला पिण्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो. या कोजागरी पौर्णिमेचा दिवस आणखी गोड करण्यासाठी प्रियजणांना पाठवा हे शुभेच्छा संदेश.

कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

अश्विन पौर्णिमेला शरद पौर्णिमा अथवा कोजागरी पौर्णिमा असं म्हणतात. या वर्षी बुधवार १६ ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमा आहे. कोजागरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे चंद्रप्रकाश नेहमीपेक्षा लख्ख आणि जास्त असतो.

कोजागरीला जागरण करत माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. शिवाय चंद्रप्रकाशाचे प्रतिक म्हणून दूधाचे प्राशन केले जाते. चंद्रप्रकाशातील दूध कोजागरीला पिण्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो हेच कोजागरी पौर्णिमेचे महत्त्व आहे. कोजागरी पौर्णिमेच्या प्रियजणांना शुभेच्छा पाठवून हा दिवस गोड करा.

कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा

मंद प्रकाश चंद्राचा,

त्यात गोडवा दुधाचा,

विश्वास वाढू दे नात्याचा,

त्यात असू दे गोडवा साखरेचा…

कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

आली कोजागिरी पौर्णिमा,

शरदाचे चांदणे घेऊन,

कोण कोण जागे हे पाहते लक्ष्मी दाराशी येऊन,

कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते,

जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत

आर्शीवाद देवूनी जाते.

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,

चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,

दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,

आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे…

कोजागरीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राच्या साथीने मिळाली बासुंदीची मेजवानी,

कोजागिरीच्या रात्री लिहिली जागरणाची कहाणी…

कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

दूध हे केशरी,

कोजागिरीचे खास,

वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात,

परमेश्वराकडे प्रार्थना

आपल्या नात्यात असाच वाढावा गोडवा

आणि आयुष्यभर मिळावी आपली साथ…

कोजागिरीच्या मनपूर्वक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात

सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि

दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो…

हिच आमची मनोकामना…

कोजागरी पौर्मिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राची शितलता, शुभ्रता, कोमलता,

उदारता, प्रेम आपल्याला आणि

आपल्या कुटुंबाला मिळो

हिच आजच्या दिवशी प्रार्थना…

कोजागरीच्या हार्दिक शुभेच्छा!

चांदण्यात न्हावून निघाली चांदरात,

कोजागिरीच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश….

कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

केशरयुक्त दुधाची चवदार साथ,

ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात,

म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान,

दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात…

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मावळतीची घाई झाली सूर्यास,

कारण आज चमकण्यास आला आहे

कोजागिरीचा चंद्र नभात…

कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

कोजागिरीची आज रात,

पूर्ण चंद्रमा नभात,

चमचमत्या ताऱ्याची वरात,

चंद्राची शितलता मनात,

मंद प्रकाश अंगणात,

आनंद तराळला मनामनात…

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Whats_app_banner